Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ कार्यक्रम सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. या शोमध्ये यंदा एकूण १६ स्पर्धक सहभागी झाले होते. यापैकी पुरुषोत्तमदादा पाटील यांनी पहिल्याच आठवड्यात घराचा निरोप घेतला. तर, उर्वरित १५ स्पर्धक सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. पहिल्याच आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात दोन गट पडले होते. यापैकी एक गट निक्कीचा तर दुसरा गट अभिजीत सावंत, अंकिता, वर्षा, योगिता, पंढरीनाथ यांचा आहे. आतापर्यंत पार पडलेल्या दोन भाऊच्या धक्क्यांवर रितेश देशमुखने निक्की अन् टीमची चांगलीच शाळा घेतली आहे. मात्र, एवढे बोलूनही या टीमच्या वागण्यात काहीच सुधारणा झालेली नाही. घरात सतत टोकाचे वाद पाहायला मिळत आहेत.

‘बिग बॉस’च्या तिसऱ्या आठवड्यात पहिल्याच दिवशी घरात बाहुल्यांरुपी दोन बाळांचं आगमन झालं होतं. ‘बिग बॉस’ने यासंदर्भात एक टास्क सदस्यांना दिला होता. परंतु, हा टास्क करताना दोन्ही गटांमध्ये वाद झाले. निक्कीने तर विरुद्ध टीममधील सदस्यांच्या बाहुलीचा एक पाय देखील तोडला. यामुळे ‘बिग बॉस’ने देखील हा भावनांचा खेळ होता पण, तुम्ही सगळे भावनाशून्य होऊन खेळलात अशी टिप्पणी केली होती. याशिवाय अरबाज व वैभवने मालवणी ही मराठी भाषा नाही असं वक्तव्य या टास्कदरम्यान केल्याने नेटकरी सुद्धा संतप्त झाले आहेत. या सगळ्या प्रकारानंतर आता मराठी मनोरंजनविश्वातून विविध कलाकारांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance Video
‘झुमका गिरा रे…’, ५९ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर Bigg Boss फेम योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स! पतीची खास कमेंट
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Bigg Boss Marathi Season 5 Dhananjay Powar answer to troller
“फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक…” म्हणणाऱ्यावर धनंजय पोवार भडकला, म्हणाला, “किती घाणेरडी वृत्ती…”
Bigg Boss 18 Vivian Dsena for dragging Chum Darang during Ticket to Finale Task
Video: कधी लाथ मारली, तर कधी चुमला फरफटवलं; विवियन डिसेनाचा आक्रमकपणा पाहून नेटकरी म्हणाले, “आम्ही तुझ्या पाठिशी…”
Bigg Boss 18 Kamaal Khan share chahat pandey boyfriend photo
Bigg Boss 18: २१ लाखांचं बक्षीस जाहीर केल्यानंतर ‘या’ अभिनेत्याने चाहत पांडेच्या बॉयफ्रेंडबद्दल केला खुलासा, फोटो शेअर करत म्हणाला…
Sarangi Mahajan Serious Allegations on Dhananjay and Pankaja Munde
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप, “धनंजय आणि पंकजाने माझी साडेतीन कोटींची जमीन हडप केली, वाल्मिक कराड…”
Bigg Boss 18 Vivian Dsena Is Upset With salman khan and Kamya Panjabi
Bigg Boss 18: “…तर माझ्याजागी दुसऱ्याला बोलवा”, सलमान खान-काम्या पंजाबीने सुनावल्यानंतर विवियन डिसेना नाराज; म्हणाला, “तेव्हा मी बंडखोर..”
Bigg Boss 18 salman khan kamya Punjabi slams on Vivian dsena watch promo
Bigg Boss 18: “फक्त लूक आणि आवाजावर…”, सलमान खान-काम्या पंजाबीने विवियन डिसेनाची केली कानउघडणी, काय म्हणाले? जाणून घ्या…

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “वर्षा ताईंच्या मातृत्त्वावर बोलणं कितपत योग्य?”, निक्कीच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे मोठा वाद; माफी मागूनही नेटकरी संतापले…

अनघा अतुलची पोस्ट चर्चेत

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री अनघा अतुलने यासंदर्भात पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनघा बिग बॉसला विनंती करत लिहिते, “बिग बॉस मराठी…एक विनंती आहे. एक दिवस वाइल्ड कार्ड एन्ट्री द्या! बाई आणि बुगू बुगू च्या श्रीमुखात लगावयाची आहे.”

निक्की घरात सारखी “बाईईई…” असं म्हणत असते. त्यामुळे अनघाचा पोस्टमधून रोख निक्कीकडे आहे असं स्पष्ट होत आहे. दरम्यान, अनघाप्रमाणे यापूर्वी अभिजीत केळकर, मेघा धाडे, सुरेखा कुडची, जय दुधाणे यांनी देखील निक्कीच्या वागणुकीबद्दल संताप व्यक्त केला होता.

हेही वाचा : Video : “दोन सणसणीत कानाखाली द्याव्याशा…”, अंकिता घन:श्यामवर प्रचंड भडकली! ‘बिग बॉस’च्या घरातील नवा प्रोमो चर्चेत

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : अनघा अतुलची पोस्ट

याशिवाय या आठवड्यातून घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निखिल दामले आणि योगिता चव्हाण हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता यांच्यापैकी Bigg Boss Marathi च्या घरातून कोण घराबाहेर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader