Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा आता अंतिम आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्याच्या शेवटी यंदाच्या पर्वाचा विजेता घोषित होणार आहे. त्यामुळे सध्या ‘बिग बॉस मराठी’कडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिल आहे. निक्की तांबोळीने तिकीट टू फिनाले जिंकून ती यंदाच्या पर्वाची पहिली फायनलिस्ट झाली आहे.
सोमवारी ( ३० सप्टेंबरला ) तिकीट टू फिनालेचा टास्क पार पडला. याआधी निक्कीने आपल्याकडे असलेल्या म्युच्युअल फंड कॉइनचा वापर करून थेट तिकीट टू फिनालेच्या अंतिम फेरीत पोहोचली. त्यानंतर उर्वरित सदस्यांना आपली किंमत ठरवून त्यानंतर बाबागाडीवरून झेंडे गोळा करायचे होते. जो सदस्य कमी वेळात सर्व झेंडे जमा करणार होता त्याची किंमत ती विजेत्याला देण्यात येणाऱ्या रोख रक्कममध्ये जमा होणार होती. यावेळी धनंजय, अंकिता आणि अभिजीतमध्ये डील झाली. अंकिताला जर २ लाखाची पाटी दिली तर धनंजयला १ लाखाची पाटी द्यायची अशी डील अभिजीत बरोबर झाली. याच डीलवरून अंकिता आणि अभिजीतमध्ये राडे झाले आहेत. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.
हेही वाचा – Video: …म्हणून निक्कीला आला अंकिताचा राग, जान्हवीला म्हणाली, “ही एक नंबरची कुचकी पोरगी आहे”
‘कलर्स मराठी’च्या अधिकृत सोशल मीडियावर अंकिता आणि अभिजीतच्या राड्याचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये निक्की आणि अभिजीत डीलविषयी बोलत असतात. तितक्यात अंकिता येऊन अभिजीतला टोलाच लगावते. प्रोमोमध्ये निक्की अभिजीतला विचारते, तू डील केली म्हणून ते (अंकिता, धनंजय) तुला तीन लाखासाठी हो म्हटले? अभिजीत म्हणाला, “हो. ते म्हणाले, जे तू बोलला आहेस ते तू कर.” त्यावर निक्की म्हणाली की, जर तू डील केली नसतीस तर तुझी किंमत काय असती? त्यावर अभिजीत म्हणाला, “मला माहिती नाही.”
तितक्यात अंकिता आली आणि म्हणाली, “याने डील नाही केली.” तेव्हा अभिजीत म्हणाला, “अरे, तू स्वतः आता म्हणालीस की डीपी दादा आणि मी ही गोष्ट बोललो आहोत.” अंकिताने विचारलं, “तीन लाखाची?” पुढे अभिजीत म्हणाला, “पण शब्द मी दिला नसता तर मी जान्हवीला १ लाखाची पाटी देऊ शकलो असतो” हे ऐकून अंकिता संतापते आणि म्हणते, “शेवटच्या चार दिवसांत कशाला फिरतोयस? कशाला सारवासारव करतोय? तुला इकडेही बरं राहायचं आहे तिकडेही बरं राहायचं आहे. कशाला?” यावर अभिजीत म्हणाला, “मी ज्याचं खरं आहे त्याच्याबरोबर आहे. तुझ्याबरोबर पण नाही आणि त्यांच्याबरोबर पण नाहीये.”
हेही वाचा – ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार घौडदोड; १० दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी
अंकिता म्हणते की, अरे मग तिला द्यायचं ना. धनंजयकडे जात म्हणते, “हा, आता म्हणतो मी जान्हवीला दिलं असतं तर यांची डील झाली नसती. तर त्या शब्दांमुळे राहिलोय. याला सगळीकडे बरं राहायचं आहे. त्याला तुझ्याही (निक्की) विरोधात नाही जायचं, त्याला आमच्याही विरोधात नाहीय जायचं. त्याला जान्हवीला पण पकडायचं आहे. असं करत सगळ्यांना एकत्र पकडून त्याला पुढे जायचं आहे. पण स्वतःच्या हिंमतीवर पुढे जायचं नाहीये.”
दरम्यान, तिकीट टू फिनालेचा टास्क झाल्यानंतर ‘बिग बॉस’ने एक घोषणा केली ती म्हणजे मीड डे एविक्शनची. त्यामुळे आता येत्या दिवसांत अभिजीत, धनंजय, जान्हवी, सूरज, अंकिता आणि वर्षा उसगांवकरांपैकी कोणत्या सदस्याची अंतिम फेरीपर्यंत जाण्याची संधी हुकते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd