Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील जान्हवी किल्लेकर ही स्पर्धक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जान्हवी किल्लेकर पुन्हा एकदा असं काही बरळली आहे; ज्यामुळे मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी तिच्या विरोधात निषेध व्यक्त केला आहे. वर्षा उसगांवकरांनंतर जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा अभिनयावरून अपमान केला आहे. त्यामुळे मराठी कलाकार तिच्यावर भडकले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) मंगळवारच्या भागामध्ये जान्हवी किल्लेकरने ‘सत्याचा पंचनामा’ टास्कदरम्यान पंढरीनाथ कांबळेचा अभिनयावरून अपमान केला. जान्हवी म्हणाली, “सगळे घाणेरडे आहेत. यांच्यात दम नाहीये समोर येऊन बोलायला. पॅडी दादाच्या तर काहीतरी अंगातच घुसलंय. आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग करून दमले. आता ती ओव्हर अ‍ॅक्टिंग घरात दाखवतायत.” जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा केलेला हा अपमान ऐकून आर्या तिला जाब विचारायला गेली. तेव्हा देखील जान्हवी म्हणाली, “मी फालतू माणसांना रिप्लाय देत नाही.” अभिनेत्रीच्या या वर्तुणकीचा निषेध आता मराठी कलाकार मंडळी करत आहेत. पंढरीनाथचा अपमान केल्यामुळे तिच्यावर चहूबाजूने टीका होत आहेत.

हेही वाचा – “मी सुरज चव्हाणच्या प्रेमात” म्हणत योगिता चव्हाणने भरभरून केलं कौतुक, म्हणाली, “त्याची हाक घरची वाटायची”

Bigg Boss Marathi

‘चला हवा येऊ द्या’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता अंकुर वाढवेने ( Ankur Wadhave ) फेसबुकवर पोस्ट लिहित जान्हवीवर टीका केली आहे. अंकुरने लिहिलं की, “जान्हवीचं जेवढं वय आहे तेवढं किंबहुना त्यापेक्षा जास्त पॅडी दादाच अ‍ॅक्टिंग करिअर आहे. जान्हवी ही ॲक्ट्रेस आहे मला या शोमधे कळलं. वाक्यातल्या (,) अर्धविराम एवढं तिचं करिअर आहे आणि तिचं पॅडी दादाच्या करिअरवर बोलणं म्हणजे आकाशाकडे तोंड करून थुंकण्यासारखं आहे. जान्हवीच्या या वर्तणुकीचा निषेध!” ( Bigg Boss Marathi )

हेही वाचा –“बलात्कारासारख्या घृणास्पद कृत्याचं राजकारण…”, बदलापूर प्रकरणावर तेजस्विनी पंडितची संतप्त पोस्ट; सोनाली म्हणाली, “पुरे झालं आता…”

नेटकरीही जान्हवीवर संतापले

दरम्यान, अंकुर वाढवेच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिलं, “अरे ही बावळट काही झालं की लोकांच्या करिअरवर येतेय, आधी वर्षा ताई आणि आता पॅडी दादा. हिची लायकी नाही खरंच.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “अगदी बरोबर बोललात अंकुर दादा.” तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “आज असं वाटतं आहे की महेश मांजरेकर सर असते तर बरं झालं असतं. त्यांनी हे कधीच खपवून घेतलं नसतं. “

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 ankur wadhave reaction angry post on janhvi killekar behavior pps