Arbaz Patel Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा आहे. हे पर्व अवघ्या ७० दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मागील आठवड्यात अरबाज पटेल बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाला. पहिल्याच आठवड्यातील एका कृतीमुळे अरबाजवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याबद्दल विचारलं असता अरबाजने आता जाहीर माफी मागितली आहे. पहिल्या आठवड्यात नेमकं काय घडलं होतं आणि अरबाज त्याबद्दल काय म्हणाला, ते जाणून घेऊयात.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील एलिमिनेट झाले होते. त्यावेळी ही गोष्ट घडली होती.

“महाराजांचा जयजयकार होताच हाताची घडी घालून गप्प…”, अरबाज पटेलवर प्रेक्षकांची नाराजी, नेमकं काय घडलं?

नेमकं काय घडलं होतं?

‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घेताना पुरुषोत्तमदादा पाटील यांनी माऊलींची प्रार्थना करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयजयकार केला होता. यावेळी सगळे सदस्य हात जोडून उभे होते. यावेळी पुरुषोत्तम यांनी बाहेर जाऊन “मी सगळ्यांसाठी माऊलींकडे प्रार्थना करेन” असं सांगितलं. पुरुषोत्तमदादा पाटील महाराजांचा जयजयकार करत असताना अरबाज पटेल काहीही न बोलता हाताची घडी घालून उभा होता. त्यावरून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती.

अरबाज पटेलविरोधात त्याची गर्लफ्रेंड पोलीस तक्रार करणार? म्हणाली, “तो चुकीचा माणूस…”

अरबाज पटेल काय म्हणाला?

पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर पडले तेव्हा शिवाजी महाराजांचा जयजयकार सुरू होता, तेव्हा संभाजीनगरचा अरबाज काहीच बोलला नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील लोक नाराज झाले होते, याबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, “खरंच मला माहीत नव्हतं की असं काही घडलं आहे. कारण मी तसा नाही. मी संभाजीनगरमध्ये राहतो, ते ऐतिहासिक ठिकाण आहे हे सर्वांना माहीत आहे. आपण सगळे शिवाजी महाराजांची मूळं आहोत. ही गोष्ट घडली तेव्हा मी कदाचित काहीतरी विचार करत असेन, कारण मी ऐकलं नाही की नेमकं काय चालू होतं. पुरुषोत्तमदादा पाटील यांना मीच नॉमिनेट केलं होतं.”

अरबाज पटेल (फोटो – इन्स्टाग्राम)

Bigg Boss Marathi: अरबाज पटेल घराबाहेर पडल्यावर त्याच्या गर्लफ्रेंडची पोस्ट चर्चेत; शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

अरबाज पटेलने मागितली माफी

“माझ्या मनात काही असतं तर मी बिग बॉस मराठीमध्ये आलो नसतो. मी म्हटलं असतं की मराठी बिग बॉस आहे तर मला नाही जायचं. मी तसा व्यक्ती नाही. धर्माच्या बाबतीत मी खूप काळजी घेणारा आणि भावनिकदृष्ट्या संवेदनशील (possessive) आहे. पण जर कोणालाही चुकीचं वाटलं असेल तर मी क्षमा मागतो. कुणालाही तसं वाटलं असेल तर मी माफी मागतो”, असं अरबाज सकाळला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.