Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सुरू झाल्यापासून एक जोडी कायम चर्चेत आहे ती म्हणजे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल. या पर्वाच्या पहिल्या दिवसापासून दोघं एकत्र पाहायला मिळत आहेत. दोघांमध्ये सतत वाद होतं असले तरी काही वेळानंतर दोघं पुन्हा एकत्र झाल्याचं दिसत आहे. गेल्या आठवड्यात निक्की व अरबाजमध्ये कडाक्याची भांडणं झाली. तरी देखील या आठवड्यात दोघं एकत्र आले. निक्कीबरोबरच्या या रिलेशनशिपवर आता अरबाजच्या वडिलांनी भाष्य करत आपलं परखड मत मांडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरबाज पटेलच्या वडिलांनी नुकतीच ‘७ स्टार मराठी’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अरबाजच्या एकंदरीत खेळाविषयी सांगितलं. तसंच त्याला काही मोलाचे सल्ले देखील दिले. यादरम्यान अरबाजच्या वडिलांना निक्कीबरोबरच्या रिलेशनशिपबद्दल विचारलं. तेव्हा ते म्हणाले, “अरबाजने मैत्री पुढे नेली पाहिजे. त्याने एवढ्या मोठ्या शोमध्ये एंगेज असल्याचं सांगितलं आहे. त्यावर त्याने ठाम राहिलं पाहिजे. कारण आपली महाराष्ट्राची जनता खूप प्रेमळ आहे. खोटारटेपणा ऐकून आणि बघून देखील त्यांना विचित्र वाटतं. कारण एकाबाजूला अरबाजने एंगेज असल्याचं सांगितलं आहे आणि दुसऱ्याबाजूला तो निक्कीबरोबर असं वागतोय तर कुठेतरी ते फेक वाटतंय. जे मला ही वाटतंय. त्याने तसंच नाही केलं पाहिजे.”

हेही वाचा – Bigg Boss Marathi : ‘ए’ टीममध्ये फूट पडल्यामुळे अरबाज पटेलचे वडील चिंतेत, म्हणाले, “वैभव आणि जान्हवीबरोबर…”

पुढे अरबाजचे वडील म्हणाले, “अरबाजने वैभव आणि जान्हवीबरोबर चांगला खेळ खेळला पाहिजे. कारण मैत्रीणमध्ये एक वेगळी ताकद असते. त्या ताकदीला धरून त्याने निक्कीला सामोर गेलं पाहिजे. कारण निक्की अभिजीतकडे काही वेगळं म्हणतेय, अरबाजला काहीतरी वेगळं म्हणतेय. ती अरबाजला लांब पण करते आणि जवळ पण करते. म्हणजे तिने अरबाजला चक्रव्ह्यूमध्ये गुंतवणूक टाकलंय. ते देखील दिसतंय.”

हेही वाचा – “गर्वाची गोष्ट…” ‘बिग बॉस मराठी’ची ऑफर मिळाल्यानंतर अरबाजच्या बाबांची होती ‘ही’ प्रतिक्रिया, मुलाच्या खेळाविषयी म्हणाले, “त्याने एकट्याने…”

दरम्यान, गेल्या आठवड्यातील रितेश देशमुखच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर अरबाज पटेलने सिंगल नसून कमिटेड असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसंच त्याआधी एका रॅपिड फायर राऊंडदरम्यान देखील अरबाजने कमिटेड सांगितलं होतं. अरबाजला विचारलं होतं की, सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न पडलाय आणि याचं खरं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही सिंगल आहात की कमिटेड? यावर अरबाजने जराही वेळ न घालवता कमिटेड असं सांगितलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 arbaz patel father comments on his son relationship with nikki tamboli pps