Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सध्या दणक्यात सुरू आहे. या पर्वात एकूण १६ स्पर्धक होते. पण आता सहाव्या आठवड्यापर्यंत १२ स्पर्धक पोहोचले आहेत. प्रत्येक स्पर्धकाने आपापल्या खेळण्याच्या पद्धतीने वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यापैकी एक म्हणजे अरबाज पटेल. अरबाजने स्वतःकडे असलेल्या ताकदीच्या बळावर बरेच टास्क जिंकले आहेत. पण काही टास्कमध्ये त्याला अपयश देखील मिळालं आहे. अरबाजच्या आतापर्यंत संपूर्ण खेळण्याविषयी त्याच्या बाबांनी भाष्य केलं आहे. तसंच ‘बिग बॉस मराठी’ची ऑफर आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती? याबद्दल देखील त्यांनी सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरबाज पटेलच्या वडिलांनी नुकतीच ‘७ स्टार मराठी’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अरबाजच्या एकंदरीत खेळाविषयी सांगितलं. तसंच त्याला काही मोलाचे सल्ले देखील दिले. सुरुवातीला त्यांना विचारलं गेलं की, ‘बिग बॉस मराठी’ची ऑफर आल्यानंतर काय प्रतिक्रिया होती? यावर अरबाजचे वडील म्हणाले, “जेव्हा अरबाजला ‘बिग बॉस मराठी’ची ऑफर आली तेव्हा आई-वडिलांसाठी ही गर्वाची गोष्ट असते. कारण महाराष्ट्राचा मोठा रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ आहे. आज हा शो खूप मोठा झाला आहे, हे मला सांगायला खूप आनंद होतं आहे. महाराष्ट्राची जनता भरभरून शोला प्रोत्साहित करत आहे. त्यामुळे मला खूप गर्व आहे तो ‘मराठी बिग बॉस’मध्ये गेला आहे.”

हेही वाचा – नवरी मिळे हिटलरला : जहागीरदारांच्या घरी गणेशोत्सव जल्लोषात साजरा होणार, एजेने बनवली बाप्पाची सुबक मूर्ती

पुढे अरबाजच्या वडिलांना मुलाच्या खेळविषयी विचारलं. तेव्हा अरबाजचे वडील म्हणाले, “अरबाज चांगला खेळतोय. पण मला असं वाटतं, त्याने एकट्याने खेळलं पाहिजे. कारण त्या घरामध्ये ‘बिग बॉस’ जे टास्क देतात त्यामध्ये थोडफार वेगवेगळं खेळलं पाहिजे. अरबाजला स्वतःचा खेळ दाखवण्याची संधी मिळाली आहे. म्हणून त्याने स्वतःचा खेळ चांगला खेळला पाहिजे.”

हेही वाचा – Video: गर्दीत सुहाना खानची काळजी घेताना दिसला अगस्त्य नंदा, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बच्चन कुटुंबात…”

दरम्यान, या आठवड्यात अरबाज नॉमिनेट झाला आहे. त्यामुळे अरबाजचे वडील सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चाहत्यांना व्होट करण्यासाठी सांगत आहेत. “आतापर्यंत अरबाजला इतक्या पुढे आणलं, अजून पुढे घेऊ जा”, असं म्हणत अरबाजच्या वडिलांनी महाराष्ट्राच्या जनतेला त्याला व्होट करण्यासाठी आवाहन केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 arbaz patel father reaction after getting an offer for bigg boss marathi show pps