Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दररोज काहींना काहीतरी घडतं असतं. काल बिग बॉसच्या कल्ला टीव्हीवर स्पर्धकांचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. निक्की तांबोळी व अरबाज पटेलने दादा कोंडकेचं लोकप्रिय गाणं ‘हिल हिल पोरी हिला’वर भन्नाट डान्स केला. तसंच योगिता आणि निखिल दामलेने देखील डान्स केला. अभिजीत सावंतने ‘सर सुखाची श्रावणी’ गाणं गायलं. तर पंढरीनाथ कांबळेने इतर स्पर्धकांची नक्कल केली. घरातील प्रत्येक स्पर्धकाने जबरदस्त परफॉर्मन्स केला. अशातच आता धनंजय पोवार आणि घनःश्याम दरवडेमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडियावर नुकताच ‘बिग बॉस मराठी’चा ( Bigg Boss Marathi ) नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये धनंजय पोवार आणि घनःश्याम दरवडेमधील वाद पाहायला मिळत आहे. हा वाद ड्युटीवरून झाल्याचा दिसत आहे. या प्रोमोमध्ये डीपी घनःश्यामला विचारतो की, पुढारी तुमच्याकडे किती कामं आहेत? त्यावर पुढारी म्हणतो, “एक.” यानंतर धनंजय कोल्हापुरी पद्धतीत म्हणतो की, तोंड शिवलं होतं का आता विचारल्यावर? त्यानंतर घनःश्याम धनंजयचं हे बोलणं ऐकून रागवतो आणि त्याच्या जवळ जाऊ म्हणतो की, तोंड शिवलं का म्हणजे? ही कुठली बोलायची पद्धत आहे? ज्याची त्याची ड्युटी त्याला काही बोलायचं नाही. यावर धनंजय म्हणतो, “मी केव्हाही बोलणार. मी वाटलं तेव्हा बोलणार. हात खाली घे.” घनःश्याम म्हणतो, “माझा हात आहे.” धनंजय म्हणतो, “माझं तोंड आहे.” यावर घनःश्याम म्हणतो, “तुमच्या तोंडाला लागलं नाही ना पाप?” डीपी म्हणतो, “लावू नकोस.” त्यावर छोटा पुढारी म्हणतो, “नाहीच लावणार.”

हेही वाचा – Video: “इस बार तेरे शहर में, जो सावन आया है…”, अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रदर्शित, तीन तासांत मिळाले फक्त ‘इतके’चं व्ह्यूज

धनंजय आणि घनःश्याममधील हा वादाचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. ‘कोल्हापुरची पद्धत आहे रे’, ‘अरे ही कोल्हापुरची भाषा आहे’, ‘पुढारी तू डीपी दादा समोर काहीच नाहीये’, ‘कोल्हापुरच्या शिव्या ऐकल्यावर पुढाऱ्याला सोसणार नाहीत’, ‘कोल्हापुरी दणका पडायला लागतोय या छोट्याला’, ‘एकच नंबर दादा’, ‘लेका कोल्हापुरकर आहे ते नको नादाला लागू’, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत. ( Bigg Boss Marathi )

Bigg Boss Marathi

हेही वाचा – मिलिंद गवळींनंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतलं ठाण्यात नवं घर, आई-वडिलांबरोबर केला गृहप्रवेश

दुसऱ्या आठवड्यात कोणते स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत?

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) दुसऱ्या आठवड्यात योगिता, पंढरीनाथ, निक्की, घन:श्याम, सूरज आणि निखिल असे सहा स्पर्धक घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता पुरुषोत्तमदादा पाटीलनंतर कुठला स्पर्धक घराबाहेर होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 argument between dhananjay powar and ghanshyam darwade pps