Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील गुरुवारच्या (२९ ऑगस्ट) भागात ‘पाताळ लोक’ टास्क पार पडला. यात पाताळ लोकामध्ये जाऊन सोन्याची नाणी जमा करायचा हा खेळ होता. या टास्कमध्ये ‘ए’ टीममध्ये निक्की-अभिजीत, घन:श्याम – पॅडी, वैभव-धनंजय या जोड्या होत्या. तर ‘बी’ टीममध्ये जान्हवी-सूरज, अरबाज-आर्या, अंकिता-वर्षा या जोड्या होत्या. सर्वाधिक नाणी ‘बी’ टीमने जमा करून या टास्कमध्ये विजय मिळवला. त्यानंतर विजयी झाल्यामुळे ‘बी’ टीमला एक विशेष अधिकार देण्यात आला. तो म्हणजे कॅप्टन्सीच्या रेसमधून हरलेल्या ‘ए’ टीममधून दोन जोड्या बाद करण्याचा निर्णय ‘बी’ टीमच्या हाती देण्यात आला. त्यामुळे ‘बी’ टीमने ‘ए’ टीममधील निक्की-अभिजीत आणि पंढरीनाथ-घनःश्याम या दोन जोड्यांना कॅप्टन्सीच्या रेसमधून बाहेर केलं. आज कॅप्टन्सीचा टास्क पार पडणार आहे. यासंदर्भात एक धक्कादायक प्रोमो समोर आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा