Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाची नुकतीच सुरुवात झाली आहे. यंदाच्या सीझनमध्ये एकूण १६ स्पर्धकांनी घरात प्रवेश घेतला असून या सगळ्यांमध्ये विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी तगडी स्पर्धा सुरू झालेली आहे. परंतु, खेळ सुरु झाल्यावर पहिल्याच दिवशी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रेमाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड प्रीमियरला निक्की तांबोळीने रितेश देशमुखसमोर आपण अरबाज पटेलवर फिदा झाल्याचं सांगितलं होतं. आता घरात प्रवेश केल्यावर दुसऱ्याच दिवशी छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडे निक्की आणि अरबाजला एकमेकांच्या नावाने चिडवत निक्कीला वहिनी म्हणून हाक मारणार आहे.

हेही वाचा : “डिअर कोकण हार्टेड बॉय…”, Bigg Boss फेम अंकिता वालावलकरने दिली प्रेमाची जाहीर कबुली, लग्न केव्हा करणार?

Bigg Boss च्या निक्की अरबाजची जोडी जमणार का?

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या दिवसाचा प्रोमो समोर आला असून दुसऱ्याच दिवशी घरातील सदस्य रोमँटिक अंदाजात दिसून येत आहेत. प्रोमोमध्ये निक्की तांबोळी चहा बनवायला घेते. पण, चहाचा हीटर चालत नसल्याने ती घन:श्यामला ‘बिग बॉस’ला विनंती करण्यास सांगते. त्यावेळी छोटा पुढारी म्हणतो, “‘बिग बॉस’ आमच्या वहिनीचं तरी ऐका…” त्यावर अरबाज त्याला लाजत म्हणतो, “थांब रे सकाळी सकाळी असं काय म्हणतो तू…”. पुढे छोटा पुढारी म्हणतो, “तुझं प्रेम उतू चाललंय ते सांगतोय…चहा उतू गेला, तर काही बिघडत नाही”. छोटा पुढारीच्या या वक्तव्यावर अरबाज आणि निक्कीला हसू अनावर होतं. अरबाज तर डोक्यालाच हात लावतो. त्यानंतरही छोटा पुढारी पुढे म्हणतो, “प्रेमात असचं असतंय ‘बिग बॉस’. घन:श्याममुळे ‘बिग बॉस मराठी’च्या घरात हास्यकल्लोळ होतो.

हेही वाचा : राणी माझ्या मळ्यामंदी…; मराठी गाणं अन् विकीच्या ‘तौबा तौबा’ गाण्याची हूकस्टेप! आमिर खानच्या जावयाचा जबरदस्त डान्स

Bigg Boss मराठीचा हा नवीन प्रोमो कलर्स मराठी वाहिनीवर शेअर करण्यात आला आहे. आता हा प्रोमो पाहून बिग बॉसच्या घरात अरबाज निक्कीची पहिली जोडी जमणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

निक्की तांबोळी व अरबाज पटेल

दरम्यान, ‘Bigg Boss मराठी’च्या ग्रँड प्रीमियरला निक्की तांबोळी अरबाजकडे पाहून लाजताना दिसली होती. अरबाजला पाहून सगळंच विसरली असल्याचं ती म्हणाली होती. रितेश देशमुखला सुद्धा निक्की “थोडं थोडं काहीतरी होऊ शकतं” असं म्हणाली होती. तर दुसरीकडे अरबाजही, निक्कीला “आता तुला सगळीकडे मीच दिसेन, माझ्याशिवाय तिला दुसरं काही सुचणार नाही, असं म्हणाला होता”. त्यामुळे आता ‘बिग बॉस मराठी’च्या या सीझनमध्ये निक्की आणि अरबाजची जोडी जमणार का? याकडे ‘बिग बॉस’प्रेमींचं लक्ष लागलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 chota pudhari teases nikki tamboli and arbaz patel watch new promo sva 00