Bigg Boss Marathi Seaon 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाबद्दल गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकाच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यंदाच्या सीझनमध्ये आणकी काय काय ट्विस्ट येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असताना आता ‘बिग बॉस’च्या टीमकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं समोर आलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा गाशा अवघ्या ७० दिवसांमध्ये गुंडाळला जाणार आहे. शोला मोठ्या प्रमाणात टीआरपी असताना अचानक असा निर्णय घेण्यात आल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
‘बिग बॉस’ने ( Bigg Boss Marathi ) हा सीझन ७० दिवसांमध्ये संपणार असल्याची घोषणा सगळ्या सदस्यांसमोर आज ( २३ सप्टेंबर ) प्रदर्शित झालेल्या भागात केली. यावेळी ‘बिग’ बॉस म्हणतात, “यंदाचा सीझन केवळ १० आठवड्यांचा असून, येत्या ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा पार पडेल” असं घरात जाहीर करण्यात आलं आहे.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : घरातील सगळे ८ सदस्य झाले Nominate! ‘बिग बॉस’ने दिला मोठा धक्का, काय आहे कारण?
केव्हा असणार ग्रँड फिनाले?
यावर्षी ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) पाचव्या पर्वाला विशेषत: शनिवार-रविवारी होणाऱ्या भाऊच्या धक्क्याला ४.५ ते ४.७ यादरम्यान टीआरपी मिळाला आहे. त्यामुळे टीआरपीची आकडेवारी पाहता कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद असल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र, घवघवीत यश मिळत असताना ‘बिग बॉस’च्या टीमने ७० दिवसांमध्ये शो बंद करण्याचा निर्णय अधिकृतपणे घेतला आहे.
यंदाचा सीझन शंभर नव्हे तर ७० दिवसांचा आहे असं घरात जाहीर करण्यात आलं. यामुळे ६ ऑक्टोबरला एक मोठी गोष्ट घडणार आहे. ती म्हणजे, एकाच वेळी ‘बिग बॉस’चे दोन्ही सीझन एकमेकांना भिडणार आहेत. ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. तर, याच दिवशी सलमान खानच्या हिंदी ‘बिग बॉस’चा ग्रँड प्रीमियरचा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या सीझनमध्ये ६ ऑक्टोबरला क्लॅश पाहायला मिळेल.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : १०० नव्हे तर फक्त ७० दिवसांत संपणार पाचवा सीझन! ‘या’ दिवशी असेल ग्रँड फिनाले, जाणून घ्या…
दरम्यान, समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन शंभरऐवजी ७० दिवसांमध्ये संपवण्यामागे हिंदी बिग बॉस कारणीभूत ठरल्याच्या चर्चा सुरू आहेत. मेकर्सला दोन्ही ‘बिग बॉस’मध्ये क्लॅश नको होता. याशिवाय दोन्ही सीझन एकाच वेळी सुरू राहिले, तर प्रेक्षकवर्ग सुद्धा विभागला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मेकर्सनी शो शंभर ऐवजी ७० दिवसांमध्ये संपवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. नेटकऱ्यांनी ‘कलर्स मराठी’च्या पोस्टवर कमेंट करत या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.