Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून जसजसे सदस्य कमी होतं आहेत तसतसं पर्व रंजक होतं चाललं आहे. आता फक्त आठ सदस्य घरात राहिले आहेत. शनिवारच्या ‘भाऊच्या धक्क्या’वरून संग्राम चौगुले घराबाहेर गेला. वैद्यकीय कारणास्तव संग्रामचा ‘बिग बॉस मराठी’मधला प्रवास संपला. त्यामुळे आता आठ सदस्यांपैकी कोण बाजी मारून ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार याची उत्सुकता लागली आहे.

आज ‘भाऊच्या धक्क्या’वर ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली. यावेळी चित्रपटाच्या टीमने घरातील सदस्यांबरोबर मजेशीर खेळ खेळत धमाल-मस्ती केली. याचे व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत. नुकताच धनंजय पोवार आणि वर्षा उसगांवकर यांचा खेळ खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

Nano Fertilisers loksatta marathi news
लोकशिवार : नॅनो खते; पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील आविष्कार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
All three parties in the Grand Alliance are contesting for the post of Guardian Minister Mumbai news
पालकमंत्रीपदासाठी ओढाताण; जिल्ह्या-जिल्ह्यांत महायुतीतील तिन्ही पक्षांची दावेदारी
potato prices , prices vegetables pune,
आवक वाढल्याने कांदा, मटार, शेवगा, बटाट्याच्या दरात घट
appear in Celebrity MasterChef show coming soon
‘बिग बॉस मराठी ५’ फेम निक्की तांबोळी ‘या’ लोकप्रिय कार्यक्रमात झळकणार, सोबतीला असणार उषा नाडकर्णींसह प्रसिद्ध कलाकार
463rd Sanjeev Samadhi ceremony of Shri Morya Gosavi Maharaj concluded
पिंपरी : पुष्पवृष्टी, नगरप्रदक्षिणा, कीर्तन, महापूजा आणि महाप्रसादाने महोत्सवाची सांगता
Pomegranate loksatta news
फळबाजारात फडकतोय डाळींबाचा “भगवा”, आवक घटल्याने डाळींबाची चढ्या दराने विक्री
CIDCO Exhibition, Vashi CIDCO Exhibition,
नवी मुंबई : चटण्यांपासून चित्रांपर्यंत ‘सरस’ रेलचेल
Bigg Boss Marathi Season 5
Bigg Boss Marathi Season 5

हेही वाचा –Video: ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाच्या टीमबरोबर ‘बिग बॉस मराठी’च्या सदस्यांचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडिया पेजवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये धनंजय व वर्षा उसगांवकर यांच्या डोळ्यांवर पट्टी आहे. धनंजय पदार्थ चाखून वर्षाताईंना तो समजवताना दिसत आहे. वर्षाताईंना पदार्थ ओळखायचं आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला स्वप्नील जोशी धनंजयला समजवतो की, गोड आहे की तिखट आहे इथून पासून सुरू करा. तेव्हा धनंजय म्हणतो, “मला चव कळत नाही ओ.” तेव्हा वर्षाताई विचारतात, “ग्रामीण बाजाचा पदार्थ आहे की शहरी बाजाचा.” त्यावर धनंजय म्हणतो, “ग्रामीण आहे. मला वाटतं, नाश्ताला हा पदार्थ कुठेतरी गाड्यावर मिळतो.” हे ऐकून वर्षाताई विचारतात, “त्रिकोणी असतो?” तेव्हा धनंजय म्हणतो, “हो त्रिकोणी असतो. चपटं सँडविचसारखा प्रकार आहे; जो तेलामध्ये फ्राय केल्यासारखा आहे.” यावर वर्षा उसगांवकर म्हणतात, “म्हणजेच समोसाचं ना.” हे ऐकून घरातील सदस्य हसतात.

यानंतर धनंजय वर्षाताईंना विचारतो, “मुंबईमध्ये काय फेमस आहे?” यावर वर्षा ताई म्हणतात की, मुंबईमध्ये समोस लोकप्रिय आहे. त्याचवेळी पंढरीनाथ उठतो आणि म्हणतो, “जो पदार्थ तुमच्या आवडीचा आहे. तो चायनामध्ये पण मिळतो.” तेव्हा सगळे सदस्य ओरडून सांगतात की, ताई चायनिज पदार्थ आहे. भारतामध्ये पण मिळतो. त्यानंतर पंढरीनाथ म्हणतो की, त्याच्या लेखी तुम्हाला फार किंमत नाही. मग धनंजय म्हणतो, “जे तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाकून दिला होता. त्याची वडी असू शकते ही.” तेव्हा वर्षा उसगांवकर ओळखतात आणि म्हणतात की, कोथिंबीर वडी आहे.

हेही वाचा – Video: घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव ऐकताच निक्की तांबोळीचा फुटला टाहो, ‘हे’ सदस्य झाले सेफ, पाहा प्रोमो

दरम्यान, सध्या ‘बिग बॉस मराठी’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. १०० दिवस नाहीतर ७० दिवसांत ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व गुंडाळणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण अद्याप ‘कलर्स मराठी’ने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

Story img Loader