Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा आता आठवा आठवडा सुरू झाला आहे. नुकत्याच झालेल्या ‘भाऊच्या धक्का’वर धमाल, मस्ती आणि भावुक क्षण पाहायला मिळाले. या धक्क्यावर रितेश देशमुखने घरातील सर्व सदस्यांना मोठं सरप्राइज दिलं. स्वतः ‘बिग बॉस’च्या घरात जाऊन रितेशने सदस्यांच्या कुटुंबियांचा संदेश व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचवला. हे पाहून सर्व सदस्य भावुक झालेले पाहायला मिळाले. रविवार झालेल्या धक्क्याच्या शेवटी वैभव चव्हाण एलिमिनेट झाला. रितेश वैभवला घेऊन घराबाहेर आला. आता आठव्या आठवड्यात काय-काय घडणार? हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे. अशातच धनंजय पोवार अंकितावर नाराज असल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सिने मराठी’ या इन्स्टाग्राम पेजवर धनंजय पोवारचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये धनंजय संग्राम आणि अभिजीतसमोर अंकितावर असलेली नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. या व्हिडीओत अभिजीत धनंजयला विचारतो, “अंकिता बरोबर काय वाकडं झालं आहे?” तेव्हा डीपी म्हणतो, “बास झालं हो” हे ऐकून अभिजीतने विचारलं, “आता सहन होतं नाही?”

हेही वाचा – “मी हरखून गेलो…”, अभिनेता सुव्रत जोशीला कॅबमध्ये आला एक वेगळाच अनुभव, म्हणाला, “मला कलाकार म्हणून खूप काही देऊन गेला…”

अभिजीतच्या प्रश्नावर धनंजय पोवारने पुढे चांगलंच उत्तर दिलं. तो म्हणाला, “अटॅचमेंट आहे, ती तेवढ्या पुरती राहू द्या…मी तिला स्पष्ट सांगितलंय. जिथे मला दिसेल तू अडचणीत आहेस, तिथे मी उभा राहणार. इतर वेगळी तू माझ्याकडून अपेक्षा करू नकोस. आता बास…कसं आहे माहिती आहे का, पुस्तकाची पानं भरपूर आहेत. पण ते पाटपोट आहेत ना. तुम्ही फक्त उजव्या बाजूचीच पानं बघतं चालला आहात. डाव्या बाजूला देखील लेखकाने लिहिलायला कष्ट घेतले आहेत ना. तुम्हाला उजव्या पानावर लिहायला जी मजा येते, ती डाव्या पानावर येत नाही. याचा अर्थ असा नाही की त्याची किंमत संपली. पुढं गेल्यानंतर तिच डावी पानं आपल्याला आवडायला लागतात. कारण त्याच्यावर लिहिताना एक मऊपणा येतो आणि उजव्याकडची पानं लिहायला कंटाळा येतो. या घरात तशी अवस्था माझी झाली आहे.” धनंजय दिलेलं उदाहरणासहित स्पष्टीकरण ऐकून अभिजीत म्हणाला, “बहुत बढिया.”

हेही वाचा – Video: “तुझा एवढ्या दिवसांचा स्ट्राँग प्रवास पाहून…”, पंढरीनाथ कांबळेच्या मुलीने दिला धीर, म्हणाली…

धनंजय पोवारच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “डीपी दादा बरोबर आहे. अंकिताच्या नादी लागू नको.” तसंच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “डीपी दादा तुम्हाला दीड महिना माणसं ओळखायला दीड महिना लागला. मी पहिल्या दिवशी ओळखलं, अंकिता आतल्या गाठीची आहे.” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, डीपी दादा बरोबर आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 dhananjay powar is upset on ankita walawalkar pps