Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सध्या आठवा आठवडा सुरू आहे. नुकताच घराला नवा कॅप्टन मिळाला आहे. अरबाज पुन्हा एकदा कॅप्टन झाला आहे. ‘कोणाचं गोड पाणी कोणाची तहान भागवणार?’ या अंतिम कॅप्टन्सी टास्कमध्ये सर्वाधिक बीबी करन्सी जिंकून अरबाजने बाजी मारली आहे. या टास्कमध्ये त्याला निक्की आणि जान्हवीची साथ मिळाली. निक्की आणि जान्हवी खेळल्यामुळे अरबाज विजयी झाला. अशातच धनंजय पोवारच्या आई आणि पत्नीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धनंजय पोवारच्या इन्स्टाग्रामवर हा व्हायरल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत धनंजयच्या एका कृतीविषयी दोघी बोलताना दिसत आहे. अलीकडेच धनंजय गार्डन एअरमधील सोफ्यावर उश्याशी आई लिहून झोपलेला दिसला. त्याच्या याच कृतीमुळे दोघी भारावून गेल्या.

हेही वाचा – “प्रचंड हुशारीने गेम खेळतोय”, अरबाजचं कौतुक करत मराठी अभिनेत्याचा पंढरीनाथ, अंकिता आणि डीपीला सवाल, म्हणाला, “असा गेम…”

या व्हिडीओत धनंजयची पत्नी म्हणतेय, “‘बिग बॉस’मधील एक गोष्ट लक्षात आली का? ते आई नाव उश्याशी लिहून झोपले होते. भारी वाटलं. ऐरवी आम्ही सासू, सूना माझं-तुझं करतो. पण उश्याशी आई लिहिलेलं बघून खूप भारी वाटलं. मम्मींना विचारायचं आहे कसं वाटलं.” त्यानंतर धनंजयची पत्नी त्याच्या आईला विचारते की, मम्मी, तुमचं श्रावण बाळ आई नाव उश्याशी लिहून झोपला होतं कसं वाटलं? तेव्हा धनंजयची आई म्हणाली, “एकदम छान वाटलं. त्याला वाटलं माझ्या आईचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे. म्हणून तो नाव लिहून झोपला असेल. त्याला माझी आठवण येत असेल.”

पुढे धनंजयची पत्नी नाराज होत म्हणते, “ते नव्हे, पप्पांच्या आठवणीत रडले, तुमची आठवण आली उश्याशी आई नाव लिहिलं. माझी आठवण यांना का येत नसेल?” यावेळी धनंजयच्या आईने मजेशीर उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, काय माहिती… तिथं काय कविता आहे? त्यानंतर धनंजयची पत्नी म्हणाली, “‘बिग बॉस’ने एक टास्क दिला पाहिजे, बायकोच्या विषयावर १० ओळी लिहायला. बघा रडतील.” यावर धनंजयची आई म्हणाली, “तू खाली डोकं कर आणि पाय वर कर…काहीही कर…पण माझ्या लेकाला माझी नक्की आठवण येणार…”

हेही वाचा – Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीला मिळाली सव्वा लाखाची पैठणी, अनुभव सांगत म्हणाली, “आदेश भाऊजींच्या…”

दरम्यान, या आठवड्यात धनंजय नॉमिनेशनपासून बचावला आहे. या आठवड्यात अरबाज, निक्की, जान्हवी, सूरज आणि वर्षा उसगांवकर हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता आठव्या आठवड्यात कोण घराबाहेर होतंय? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 dhananjay powar mother and wife overwhelmed for this action pps