Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं सध्या जोरदार सुरू आहे. पहिल्या दिवसापासून स्पर्धकांनी हे पर्व गाजवलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाने टीआरपीसंबंधीत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. ‘बिग बॉस मराठी’ हा आता नंबर वन नॉन फिक्शन शो आहे. ३.९ टीव्हीआर रेटिंग या कार्यक्रमाला मिळालं आहे. पहिल्या दिवसापासून चर्चेत असणारी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील स्पर्धक म्हणजे निक्की तांबोळी. निक्कीचा २१ ऑगस्टला वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्ताने धनंजय पोवार उर्फ डीपीने खास अंदाजात शुभेच्छा दिल्या.
निक्की तांबोळीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाचा डीपीचा व्हिडीओ ‘टीआरपी मराठी’ने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धनंजय गार्डनमधील एक झाड घेऊन निक्कीला शुभेच्छा देताना दिसत आहे. एवढंच नव्हे तर डीपी गुडघ्यावर बसून तिच्या समोर हात जोडून शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहे.
निक्कीला शुभेच्छा देत धनंजय म्हणतो की, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू फक्त ७५ वर्ष जग. का सांगतो तुला. तुझं तारुण्य असंच टिकून ७५ वर्ष जग. इतर लोकांना आनंद दे आणि लोकांना छळू नकोस. सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत त्यांना त्रास देऊ नकोस. त्यांच्या नरड्यावर पाय दे, त्यांच्या नरड्यावर पाय देऊन उभी राहून जिंकलंस तरी चालतंय. पण मानसिक त्रास देऊ नकोस. तुला लक्ष लक्ष, कोटी कोटी, वाढदिवसाच्या शुभेच्छा. यानंतर डीपी निक्कीच्या पाया पडतो. तेव्हा निक्की नको नको म्हणत त्याचे आभार मानते. ( Bigg Boss Marathi )
पुढे डीपी म्हणतो की, शुभेच्छूक साधा सुधा एक पलीकडच्या ग्रुपमधला गरीब माणूस. धनंजयने दिलेल्या या शुभेच्छा ऐकून एकच हशा पिकतो. मग अंकिता, अभिजीत निक्कीला शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा – “सुरज चव्हाणने सहानुभूतीच्या जीवावर बिग बॉस जिंकलं नाही पाहिजे”, मराठी अभिनेत्याचं वक्तव्य, म्हणाला…
हेही वाचा – Video: ‘पारू’ मालिकेत नात्यांचा नवा अध्याय सुरू होणार, प्रितमची प्रेयसी प्रियाचं सत्य समोर येणार
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) पाचव्या पर्वातील चौथ्या आठवड्यात आर्या जाधव, इरिना, अभिजीत सावंत आणि वैभव चव्हाण हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. आता या चार स्पर्धकांपैकी कोण घराबाहेर जाणार, हे येत्या रविवारी स्पष्ट होईल.