‘बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi )च्या पाचव्या पर्वाला सुरुवात झाली असून आता स्पर्धकांमध्ये भांडणांनादेखील सुरुवात झाली आहे. निक्की तांबोळीचा घरातील इतर सदस्यांबरोबर वाद होताना दिसत आहे. आता आजच्या भाागात पाहायला मिळणार आहे की, जान्हवी किल्लेकरसोबत बोलताना निक्की तांबोळीने आपल्याला कोणती गोष्ट खटकली हे सांगितले आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात निक्की तांबोळी जान्हवीला म्हणते, “निखिलने मला सांगितलं की तिने जे मागवलंय ते येतंय तर तुझं पण किनोवा येईल. त्यावर मी त्याला हो असं उत्तर दिलं. पण यावर अंकिता वालावलकरने मात्र वेगळचं तोंड केलं होतं. तेव्हा मला खूप राग आला. मी त्यावेळी खरचं खूप सुनावलं असतं. पण मला खूप भूक लागली होती. त्यामुळे मला वातावरण खराब करायचं नव्हतं. वेळ आल्यावर मी नक्की बोलेल. छोट्या छोट्या गोष्टींवर मला वाद घालायचा नाही. कारण माझा वाद हा वाद नसतो तर तो बतंगडा असतो”. निक्की तांबोळीच्या या बोलण्यावर जान्हवी मात्र जोरजोरात हसते.

second girder, Gokhale railway flyover,
अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाची दुसरी तुळई बसवण्याच्या कामाला सुरुवात
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
traffic jam at Ghodbunder road , thane
कोंडीच्या चक्रव्यूहात घोडबंदरकर, सलग दुसऱ्या दिवशी वाहतुक कोंडी, वाहन चालकांकडून संताप व्यक्त, महिला प्रवासी रडकुंडीला
If we want to end rape from the root we have to finish male power
पुरुषसत्तेला ‘फाशी’ द्या…
pain relief, dry needling, physiotherapy, exercise, lifestyle changes, neck pain, chronic pain, pain management, posture improvement, patient education,
Health Special: जो दुसऱ्यावरी विसंबला..
Deonar, bio waste, Ambernath, Deonar Bio Waste Plant, Deonar Bio Waste Plant to Relocate to Ambernath, pollution,
मुंबईचा जैविक कचरा अंबरनाथमध्ये? जांभिवलीच्या औद्योगिक वसाहतीत भूखंड देण्याच्या हालचाली
Clash between two generations in virtual and real world
सांधा बदलताना : हा खेळ आभासांचा
ukraine tanks kursk
युक्रेनच्या आक्रमणाला ब्रिटिश रणगाड्यांची कुमक; रशियात तणाव

हेही वाचा: Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस’च्या घरात मोठा ट्विस्ट! सदस्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला, पाहा प्रोमो

इरिना भांडी घासणार का?

दुसरीकडे निखिल दामले इरिना रूडाकोवाला विचारतो,”तू भांडी घासू शकतेस ना? कारण- सूरज आणि तू भांडी घासणार आहात, अशी घरात चर्चा आहे. त्यावर अंकिता म्हणते,”तिने अगदीच काही खाल्लेलं नाही. जेवणानंतर मी भांडी घासू शकते”. पण इरिना म्हणते,”मी भांडी घासू शकते. पण सगळी भांडी घासू शकत नाही”. त्यावर निखिल म्हणतो,”सूरज आहे तुझ्यासोबत, त्याने भांडी घासायला सुरुवातदेखील केली आहे”. तर अंकिता इरिनाला विचारते,”तुला माणसं कमी पडत आहेत की तुला भांडी घासायची नाहीत. यावर इरिना म्हणते,”मी भांड्यांचा वापर केलेला नाही, तर मी का घासायची?”. इरिनाला उत्तर देत निखिल म्हणतो,”अजून कोणाच्या ड्युटी ठरलेल्या नाहीत. उद्या ड्युटी ठरल्यानंतर तुझ्याकडे जर भांडी घासायची ड्यूटी असेल तर तेव्हा तुला तू त्या भांड्यांचा वापर केलाय की नाही याचा विचार न करता तुला ती सगळी भांडी घासावीच लागतील”.

आता बिग बॉसच्या घरात आणखी काय घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.