‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिजीत सावंत आता लवकरच नव्या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’ या कार्यक्रमात अभिजीत सावंत वेगवेगळे पदार्थ बनवताना दिसणार आहे. या कार्यक्रमात अभिजीतसह निक्की तांबोळी, तेजश्री प्रकाश, उषा नाडकर्णी हे मराठी कलाकार झळकणार आहेत. २७ जानेवारीपासून ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’ कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सध्या या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात अभिजीत व्यग्र आहे. बऱ्याच दिवसांनंतर कामातून त्याला वेळ मिळाल्यामुळे त्याने कुटुंबाबरोबर एक रील व्हिडीओ केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’नंतर अभिजीत सावंत सोशल मीडियावर खूप सक्रिय झाला आहे. नेहमी फोटो, रील व्हिडीओ शेअर असतो. नुकताच त्याने पत्नी आणि मुलींबरोबरचा एक रील व्हिडीओ शेअर केला आहे.

“जेव्हा तुम्हाला खूप दिवसांनी मुलांबरोबर वेळ घालवायला मिळतो तेव्हा एक रील व्हिडीओ झालाचं पाहिजे,” असं कॅप्शन लिहित अभिजीत सावंतने रील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीतने पत्नी आणि मुलींबरोबर ट्रेडिंग गाण्यावर रील केल्याचा पाहायला मिळत आहे. यावर अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अभिजीतच्या या व्हिडीओवर जान्हवी किल्लेकर प्रतिक्रिया देत म्हणाली, “किती गोड आहे. खूप छान आहे.” तर योगिता चव्हाणदेखील “खूप गोड” अशी प्रतिक्रिया दिली आहे. अभिजीतचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

दरम्यान, ‘इंडियन आयडल’च्या पहिल्या पर्वाचा विजेता अभिजीत सावंत ‘बिग बॉस मराठी’मुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ‘इंडियन आयडल’ जिंकल्यानंतर काही वर्षांनी अभिजीत सावंतच्या करिअरला उतरती कळा लागली होती. पण, अभिजीतने त्याच्या आवाजाने श्रोत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून ठेवलं आहे. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात अभिजीत झळकल्यानंतर श्रोत्यांनी त्याच्यावर भरभरून प्रेम केलं. त्याला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा उपविजेता ठरवलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 fame abhijeet sawant reel video with wife and daughters pps