Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपायला अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. या पर्वाचा महाअंतिम सोहळा ६ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे आतापासून ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व कोण जिंकणार? याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. यंदाच पर्व विशेषतः घरातील सदस्यांनी चांगलंच गाजवलं. पाचव्या पर्वातील सदस्य हे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिले. त्यापैकी एक म्हणजे अंकिता वालावलकर.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने लोकप्रिय असणारी कोकण कन्या अंकिता वालावलकरने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. खेळाने आणि नवनवीन स्ट्रॅटजीने अंकिताने प्रेक्षकांची मनं जिंकली. अशा ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिताची पहिली नोकरी आणि पहिला पगार काय होता? जाणून घ्या…

हेही वाचा – प्रसाद ओकच्या ‘त्या’ कृतीमुळे लग्नात रडल्या होत्या सासूबाई, किस्सा सांगत म्हणाला, “आमचं लग्न दुकानात…”

अलीकडेच अंकिता वालावलकरने ‘लोकमत फिल्मी’शी संवाद साधताना पहिल्या नोकरीविषयी सांगितलं. ती म्हणाली, “मी मुंबईत आल्यानंतर नालासोपारामध्ये राहत होते. नालासोपाराहून माझी नोकरी मानसरोवर स्टेशनला उतरून कामोठ्यामध्ये होती. जे मुंबईचे आहेत त्यांना कळलंच असेल मी किती मोठा प्रवास करून सकाळी १० वाजता कामावर पोहोचायचे. इथेच मी सिव्हिल इंजिनिअर म्हणून पहिली माझी नोकरी केली.”

अंकिताला मुंबईत नोकरी कशी मिळाली?

पुढे अंकिता म्हणाली, “कामोठ्यामध्ये काम करत असलेल्या माझ्या बिल्डिंगचं बांधकाम सुरू होतं. तेव्हा या बिल्डिंगचे कॉन्ट्रॅक्टर पर्यटक म्हणून मालवण फिरायला आले होते. त्यावेळेस ते आमच्या घरी फिरायला आले होते आणि मी पुस्तक वाचत होते; जे पुस्तक इंजिनिअरिंग रिलेटेड होतं. त्यांनी ते बघितलं आणि ते म्हणाले तू काय करतेस? मी म्हटलं सिव्हिल इंजिनिअरिंग करते. ते म्हणाले, मी असा-असा कॉन्ट्रॅक्टर आहे. तर त्याच वेळेस मी नोकरी शोधात होते. म्हणून मी म्हणाले, मुंबईत नोकरी असेल तर मग सांगा. मला मुंबईत यायचं आहे. ते म्हणाले, ठीक आहे. मी साहेबांशी बोलेन. तू मुंबईत ये आणि मला सांग. त्यांच्या भरोशावर मी मुंबईत आले.”

“मुंबईत आल्यानंतर राहायचं कुठे? मग ऑनलाइन सर्च केलं. स्वस्त कुठे आहे बघितलं. तर मग नालासोपाराचा पर्याय दाखवला होता. त्यामुळे मी मित्रांच्या मदतीने नालासोपारात फ्लॅट घेतला आणि कामोठ्याला नोकरी करत होते. तेव्हा मला १३ हजार रुपये पहिला पगार मिळत होता. त्यासाठी मी एवढ्या लांबचा प्रवास करू यायची,” असं अंकिता म्हणाला.

हेही वाचा – Video: “तुम्ही घर देतायत म्हणून…”, सूरजला सतत टोकण्यावरून निक्की-अंकितामध्ये भांडण; अभिजीत-पंढरीनाथमध्येही पडली वादाची ठिणगी

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात आता आठ सदस्य बाकी राहिले आहेत. अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, पंढरीनाथ कांबळे, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार हे आठही सदस्य या आठवड्यात नॉमिनेट आहेत. त्यामुळे या आठ सदस्यांमध्ये कोण बेघर होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 fame ankita prabhu walawalkar first job and payment pps