Bigg Boss Marathi Season 5 : ‘कोकण हार्टेड गर्ल’ नावाने लोकप्रिय असणारी कोकण कन्या अंकिता वालावलकर सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात पाहायला मिळत आहे. या पर्वात अंकिताने आपल्या दमदार खेळाने आणि युक्तीने सगळ्यांनी मनं जिंकली आहेत. गेल्या आठवड्याच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखने अंकिताने आखलेल्या रणनीतीचं चांगलंच कौतुक केलं. अशा या लोकप्रिय असलेल्या अंकिताच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अंकिताने नुकतीच शेअर केलेली ही पोस्ट वाचून काही नेटकरी भावुक झाले आहेत.

अंकिता वालावलकरच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये तिच्या बाबांचा गणपती विर्सजन केल्यानंतरचा फोटो पाहायला मिळत आहे. या फोटोत अंकिताच्या वडिलांच्या डोक्यावर पाट आणि एका हातात फटाक्यांची पिशवी दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोंमध्ये तिच्या घरचा बाप्पा पाहायला मिळत आहे.

FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…

हेही वाचा – “अभी तो खेल शुरु हुआ हैं…” म्हणत विशाखा सुभेदारने पंढरीनाथ कांबळेचं केलं कौतुक, म्हणाली, “अंदाजे तुझं वय वर्षे ५२ असावं, पण…”

हे फोटो शेअर करत अंकिता वालावलकरच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, बाबा, आतापर्यंत आपल्यात बरेच आंबट गोड खटके उडलेत. कधी तुम्ही चिडलात तर कधी मी रुसले. पण खरं सांगू बाबा कितीही मतभेद असले तरी तुम्ही आमच्यासाठी घेतलेली मेहनत आणि तुमचं प्रेम आम्हाला नेहमी दिसलं. आज ही कृतज्ञता मला व्यक्त करायची आहे.

पुढे अंकिता वालावलकरने लिहिलं आहे, “लहानपणी मी ठरवलं होतं की मुलगी असून मी तुम्हाला कसलीच कमी कधी जाणवू देणार नाही. लहानपणी फटाक्यांसाठी हट्ट करायचो पण तुम्ही महाग म्हणून द्यायचा नाहीत आणि आता नेहमी फटाके घेऊन समुद्रावर येता आणि आम्ही वाजवत देखील नाही. तुमच्या हातातली ती फटाक्यांची पिशवी कायम भरलेलीच असते.”

हेही वाचा – ‘मन धागा-धागा जोडते नवा’ फेम मयुरी देशमुखला गणेशोत्सवातील ‘ही’ गोष्ट अजिबात आवडत नाही, म्हणाली, “माझ्या घरात…”

“नेहमी गणपतीत माझी गडबड असायची कोण पाट उचलणार, विसर्जनच्या वेळी कोणी असेल ना? कारण मुलगी म्हणून इथे मी नेहमी कमी पडले. शाडू मातीची २-३ फुट उंचीची मूर्ती उचलणं मला जमण्यासारखं नाही आणि नव्हतं. पण बिग बॉसच्या घरी असताना देखील खूप आधी मी ह्या सगळ्याची व्यवस्था करून आलेय. तुम्हाला काळजी करावी लागणार नाही, सातव्या दिवशी माझे मित्र नक्की घरी येतील आणि मूर्ती विसर्जनाला मदत करतील. काळजी करू नका. गेल्यावर्षी बाप्पाबरोबर रात्री गप्पा मारल्या होत्या मी जेव्हा सगळे झोपले होते, आता मी ट्रॉफी आणि जावई घेऊनच येते घरी…,” असं अंकिता वालावलकरच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा – Video: सूरज चव्हाणला येतेय गावची आठवण, म्हणाला, “मी साधा आणि सनकी आहे, पण इथे…”

दरम्यान, अंकिता वालावलकरची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. तिच्या या सुंदर पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “तुझ्यासारखी मुलगी मिळायला नशीब लागतं”, “सामान्य मनाचं असामान्य व्यक्तिमत्त्व”, “खूप छान लिहिलंय डोळे पाणावले”, “तूच जिंकणार”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

Story img Loader