‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व चांगलंच गाजलं. त्यामुळे या पर्वातील सर्व सदस्य नेहमी चर्चेत असतात. लवकरच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेली अंकिता वालावलकर लग्नबंधनात अडकणार आहे. संगीतकार कुणाल भगतबरोबर अंकिताच लग्न होणार आहे. त्यामुळे सध्या दोघं लग्नाची जोरदार तयारी करताना दिसत आहेत. लग्नाआधी अंकिता-कुणालने योगिता चव्हाण आणि तिच्या नवऱ्याची भेट घेतली. याचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे.
अंकिता वालावलकरने योगिता चव्हाणबरोबरच्या भेटीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अंकिता, कुणाल, योगिता आणि सौरभ चौघुले पाहायला मिळत आहेत. हा फोटो शेअर करत अंकिताने लिहिलं आहे की, दोन अधिक विचार करणारे आणि दोन उत्तम संवाद साधणारे एकाच फ्रेममध्ये…ओळखा पाहू कोण?
हेही वाचा – Bigg Boss 18: रजत दलालच्या चुकीमुळे ‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
अंकिताची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टवरील ‘डीपी दादा’ म्हणजे धनंजय पोवारच्या प्रतिक्रियेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. धनंजयने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने अंकिता, कुणाल, योगिता आणि सौरभला टॅग करून लिहिलं की, पचणार नाही दोघी बहिणी आणि दोन्ही जावयांना. धनंजयच्या या प्रतिक्रियेवर अंकिता म्हणाली, “तुम्ही आधी कोणाच्या बाजूने आहात? नक्की ते सांगा.” यावर ‘डीपी’ म्हणाला, “तुझ्या नेहमी.” त्यानंतर योगिता म्हणाली की, आम्ही मटण बिर्याणी खाल्ली बरं का? मग सौरभ म्हणाला, “आधी तुम्ही भेटा ओ…नियोजन करा.”
तसंच अंकिताच्या कॅप्शननुसार अभिनेत्री हेमांगी कवीने प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, “तू आणि योगिता अधिक विचार करणारे, सौरभ आणि कुणाल उत्तम संवाद साधणारे.” दरम्यान, काही दिवसांपूर्वी अंकिताने लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर शेअर केली होती. पण, अद्याप अंकिताने लग्नाची तारीख तिने जाहीर केलेली नाही.
© IE Online Media Services (P) Ltd