Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची काही दिवसांपूर्वी सांगता झाली. यंदाच्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला. तर उपविजेता अभिजीत सावंत झाला. पण असं असली तरी प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांच्या मनात एक आपली वेगळी छाप सोडली आहे. असा एक सदस्य म्हणजे धनंजय पोवार. कोल्हापुरचा ढाण्या वाघ, डीपी अशी ओळख असणाऱ्या धनंजयने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

नुकतंच धनंजय पोवारचं कोल्हापुरात जंगी स्वागत झालं. कोल्हापुरात पोहोचताच आधी धनंजयने ज्योतिबाचं दर्शन घेतलं. त्यानंतर फुल्ल धुरळाच म्हणा. हलगी, अशा पारंपरिक वाद्यावर आणि डीजेवर धनंजयची कोल्हापुरात मिरवणुक काढण्यात आली. यावेळी धनंजयला पाहण्यासाठी कोल्हापुरकरांनी एकच गर्दी केली होती. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – Video: जया बच्चन यांनी काजोलला घट्ट मिठी मारून केलं गालावर किस, नेटकरी म्हणाले, “दोघी सारख्या…”

आता धनंजय ७० दिवसांचा ‘बिग बॉस’चा खेळ खेळून आपल्या कामावर परतला आहे. धनंजयचं स्वतःचं फर्निचरचं दुकान आहे. या दुकानात जाऊन तो पुन्हा कामाला लागला आहे. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. “कितीही मोठी उंची प्राप्त होऊदे आपली पायरी आपण सोडायची नाही”, असं कॅप्शन लिहित त्याने दुकानातल्या पहिल्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये धनंजय दुकानात जाण्यापूर्वी पाया पडताना दिसत आहे. त्यानंतर दुकानातील काम करणाऱ्या महिला धनंजयला म्हणतात, “आता खरे हिरो बननू आलेत. तब्येत पण भारी झालीये.” मग एक व्यक्ती येत आणि म्हणते, “काय शेठ? हे माझ्यापेक्षा गोरे झालेत. हा विषय काय आहे?” तेव्हा धनंजय म्हणतो, “पूर्ण वेळ एसीत होतो.” त्यानंतर सर्व महिला धनंजयला वडिलांविषयी बोलताना दिसत आहेत.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी जिंकला नसला तरी रितेश देशमुखने अभिजीत सावंतला दिली खास ट्रॉफी, गायक म्हणाला, “भाऊंनी…”

हेही वाचा – Video: आलिया भट्टने समांथा प्रभू समोर गायलं ‘ऊ अंटावा’ गाणं, व्हिडीओ होतोय व्हायरलं

दरम्यान, धनंजय पोवारच्या या व्हिडीओला लाखोंहून अधिक व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. तर हजारहून अधिक जणांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “दादा तुम्ही अशी लाख मोलाची माणसं कमवली तर अजून आयुष्यात काय पाहिजे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, शेवटी तू लोकांच्या मनावर राज्य केलेस डीपी दादा. कोल्हापुरचा ढाण्या वाघ.