‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात आता फक्त आठ सदस्य बाकी राहिले आहेत. अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, पंढरीनाथ कांबळे, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी आणि अंकिता वालावलकर या आठ सदस्यांमध्ये चुरसीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. या आठ सदस्यांमधील एकाचं नाव ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या ट्रॉफीवर कोरलं जाणार आहे. यासाठी अवघे आठ दिवस बाकी राहिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात एकूण १७ सदस्य सहभागी झाले होते. यामधील पुरुषोत्तमदादा पाटील, निखिल दामले, योगिता चव्हाण, इरिना रुडाकोवा, घनःश्याम दरवडे, आर्या जाधव, वैभव चव्हाण, संग्राम चौगुले आणि अरबाज पटेल हे घराबाहेर झाले. हे नऊ सदस्य ‘बिग बॉस’च्या घराबाहेर झाले असले तरी अजूनही चांगलेच चर्चेत आहेत. यापैकी इरिनाला ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर येताच मोठी संधी मिळाली आहे.

हेही वाचा – Video: अभिजीत सावंतच्या लव्हस्टोरीला ‘अशी’ झाली होती सुरुवात, बायकोला ‘हे’ दिलं होतं पहिलं गिफ्ट

अलीकडेच इरिनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये इरिना ‘कलर्स मराठी’वरील इंद्रायणीची भेट घेताना दिसत होती. यावरूनच इरिना आता ‘इंद्रायणी’ मालिकेत झळकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण या चर्चा अफावा नसून खऱ्या आहेत. नुकताच ‘इंद्रायणी’ मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये इरिनाची ‘इंद्रायणी’ मालिकेत दमदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे.

‘कलर्स मराठी’ने ‘बिग बॉस मराठी’नंतर इरिनाला मोठी संधी दिली आहे. ‘इंद्रायणी’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये, इंदूचा मित्र धावत मंदिरात येतो आणि तो इंद्रायणीला सांगतो की, आपल्या गावात एक गोरी बाई आली आहे. तिचे हवेत उडणारे सोनेरी केस, एकदम परी आहे; जी तुला शोधतेय. यावेळी इंद्रायणी चकीत होऊन म्हणते, “मला?” तितक्यात इरिनाची एन्ट्री होते. ती म्हणते, “इंद्रायणी वाडेकर आहेत का? रामकृष्ण हरी…” आता या परदेशी पाहुणीची गट्टी इंद्रायणीबरोबर कशी जमणार? हे पाहणं रंजक असणार आहे.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आले शरद उपाध्ये, सूरजच्या लग्नाचा प्रश्न विचारताच दिलं जबदरस्त उत्तर, म्हणाले…

इरिनाच्या दमदार एन्ट्रीचा प्रोमो पाहा…

दरम्यान, ‘इंद्रायणी’ मालिकेत इरिनाला पाहून तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. त्यामुळे इरिनाचं कौतुक केलं जात आहे. “इरिना परत आली”, “वाव इरिना गोरी बाई”, “इरिनाला मालिका मिळाली आता वैभव अरबाज, निक्की करत बसेल”, अशा संमिश्र प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 fame irina rudakova entry in indrayani serial watch promo pps