अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट बक्कळ कमाई करत आहे. या चित्रपटातील गाणी प्रत्येकाच्या ओठांवर आहेत. तसंच सोशल मीडियावर ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील गाण्यांवर जबरदस्त रील व्हिडीओ करताना दिसत आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी’मध्ये झळकलेल्या स्पर्धकांच्या मजेशीर रील व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपून दोन महिने पूर्ण झाले आहेत. तरीही त्यातील स्पर्धक नेहमी चर्चेत असतात. विविध कार्यक्रमांना हे स्पर्धक पाहायला मिळतात. तसंच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील स्पर्धक नवनवीन प्रोजेक्ट करत आहेत. नुकताच ‘किल्लर गर्ल’, ‘टास्क क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी जान्हवी किल्लेकरन मजेशीर रील व्हिडीओ शेअर केला आहे.
“सुरुवातीला मात्र लोकांच्या मनासारखं झालंय…”, असं कॅप्शन लिहित जान्हवी किल्लेकरने मजेशीर रील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी घनःश्याम दरवडे आणि अक्षय वाघमारेबरोबर पाहायला मिळत आहे. ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘अंगारों’ गाण्यावर जान्हवी, घनःश्याम आणि अक्षयने रील केला आहे. यामध्ये जान्हवी आणि अक्षयचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे.
जान्हवी किल्लेकर, घनःश्याम दरवडे आणि अक्षय वाघमारे यांच्या मजेशीर रील व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “एक नंबर रील बनवली आहे. आम्हाला खूप आवाडली.” तसंच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, बिचार घनःश्याम. तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “नको गं…तो लहान आहे.”
हेही वाचा – विजय कदम यांची पत्नी पद्मश्री जोशींबरोबर ‘अशी’ झाली होती पहिली भेट, किस्सा सांगत म्हणाल्या…
दरम्यान, ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘अंगारों’ गाणं सुपरहिट झालं आहे. हे गाणं प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषालने गायलं आहे. तर रकीब आलम यांनी लिहिलं असून देवी श्री प्रसादने संगीतबद्ध केलं आहे. तसंच ‘अंगारों’ गाण्याच नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केलं आहे. या गाण्यातील हूकस्टेप प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. त्यामुळे अजूनही गाणं ट्रेंड होतं आहे.