Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेली ‘किल्लर गर्ल’, ‘टास्क क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी जान्हवी किल्लेकर आता चांगलीच चर्चेत असते. सध्या जान्हवीच्या एका डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमधील जान्हवीच्या डान्सने आणि अदाने प्रेक्षक फिदा झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्यात पर्वातून जान्हवी किल्लेकर ही सहाव्या स्थानावरून बाहेर झाली. टॉप-६ स्पर्धकांना सात लाखांची रक्कम घेऊन खेळ सोडण्याची संधी देण्यात आली होती. पण यावेळी कुठल्याही सदस्याने खेळ सोडणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं. त्यानंतर रक्कमेत दोन लाखांची वाढ केली. त्यामुळे रक्कम एकूण नऊ लाख झाली. यावेळी मात्र जान्हवीने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जान्हवीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. कारण तिने खेळ सोडला नसता तर ती कमी मतांमुळे एलिमिनेट झाली असते. त्यामुळे तिला जे नऊ लाख मिळाले ते पण मिळाले नसते. म्हणून जान्हवीच्या निर्णयाचं अजूनही कौतुक होतं आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18 : ‘बिग बॉस १८’चा पहिला कॅप्टन झाला ‘हा’ सदस्य; असा पार पडला कॅप्टन्सीचा टास्क

नुकताच जान्हवीने इन्स्टाग्रामवर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये टास्क क्वीन शाहरुख खान आणि काजोलच्या ‘जरा सा झूम लूं मैं’ गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहे. जान्हवीचा हा डान्स व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – राहा कपूर बाबा रणबीरला ‘या’ टोपण नावाने मारते हाक, आलिया भट्टने केला खुलासा

जान्हवीच्या या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “‘बिग बॉस’नंतर जान्हवी तुला वाईट कमेंट येतील, असं वाटतं होतं. पण, असं नाही झालं. छान.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, आई गं…आता काय खरं नाही. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “भविष्यातली हॉलीवूड क्वीन.”

हेही वाचा – “रागावू नका…” म्हणत स्पृहा जोशीने केली पोस्ट, आई-वडिलांचा रुग्णालयातील फोटो केला शेअर; नेमकं काय झालं? वाचा

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या स्पर्धेतून जान्हवी बाहेर पडल्यानंतर अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, निक्की तांबोळी हे घराबाहेर झाले. अखेर अभिजीत आणि सूरज टॉप-२मध्ये आले. सर्वाधिक मतांमुळे सूरज ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 fame jahnavi killekar dance on zara sa jhoom loon main song pps