Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व चांगलंच चर्चेत आहे. पहिल्या दिवसांपासून स्पर्धक हे पर्व गाजवतं आहे. पण या पर्वात गरीब घरातून आलेल्या रीलस्टार गुलीगत म्हणजे सुरज चव्हाणने ( Suraj Chavan ) सगळ्यांची मनं जिंकली आहेत. आपल्या साधेपणामुळे सुरज अख्खा महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील त्याचं खेळणं प्रेक्षकांना खूप आवडत आहे.
पहिल्याच आठवड्यात घरातील इतर सदस्यांनी सूरजला नॉमिनेट केलं होतं. त्याला फारसा गेम न समजल्याचं कारण नॉमिनेट केलेल्या सदस्यांनी दिलं होतं. पण पहिल्या आठवड्यानंतर सुरज ज्याप्रकारे खेळत आहे, त्याचं कौतुक महाराष्ट्राभर होतं आहे. मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी देखील सूरजला पाठिंबा देताना दिसत आहेत. प्रसिद्ध झोतात आलेल्या सुरजला गुलीगत प्रमाणे घरचे अजून एका टोपणनावाने हाक मारतात. तसंच त्याचं खरं नाव घरच्यांनी ठेवलं नसून एका अमुक व्यक्तीने ठेवलं आहे. सुरजच्या नावाचा किस्सा त्याच्या आत्याने सांगितला आहे.
बारामती तालुक्यातील मोडवे गावाचा सुरज चव्हाण आहे. त्याचा जन्म देखील मोडवे येथेच झाला असून तो वास्तवास तिथेच आहे. सुरजच्या डोक्यावरून आई-वडिलांचं छत्र लहापणीच हरवलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरात ( Bigg Boss Marathi ) अनेकदा सुरज आई-वडिलांच्या आठवणीत भावुक झालेला पाहायला मिळाला. अशा या साध्याभोळ्या सुरजला महाराष्ट्र गुलीगत नावाने ओळखत असला तरी त्याला घरचे वेगळ्या टोमणनावाने हाक आहे.
‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने सुरजच्या आत्याशी संवाद साधला. यावेळी त्याच्या आत्याने नावामागची गंमत सांगितली. सुरजच्या आत्याला विचारलं की, त्याला कच्या असं का म्हणतात? यावर सुरजच्या आत्या म्हणाल्या, “आमचा एक भाऊ होता. त्याचा चुलता होता. आम्ही एकाच ठिकाणी राहायचो. आमच्या चुलत बहिणीचा मुलगा आणि सूनपण होती. त्यांच्यात भांडणं व्हायची. तर आमचा भाऊ म्हणायचा झाला कच्या चालू. त्याच्यावरून सुरजला नाव कच्या पडलं.”
हेही वाचा – “मी सुरज चव्हाणच्या प्रेमात” म्हणत योगिता चव्हाणने भरभरून केलं कौतुक, म्हणाली, “त्याची हाक घरची वाटायची”
पुढे सुरजच्या आत्याने त्याच्या खऱ्या नावामागची गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या, “आम्ही सुरज हे नावं ठेवलं नाही. हे नाव दवाखान्यात ठेवलं होतं. आमच्या इथे विलास नावाचा माणूस होता त्याने सुरजचं नाव ठेवलं. आम्ही त्याचं नाव नाही ठेवलं. सूरजच्या जन्मानंतर एकेदिवशी डॉक्टरांनी दवाखान्यात विचारलं. याचं नाव काय? त्याला काय माहित. तो म्हणाला सुरज नाडकुर्ती चव्हाण. आमचा भाऊ बायकोला नाडकुर्ती म्हणायचा. दारु पिल्यावर बायकोला हौसेने बोलायचा. मग डॉक्टरांनी मला बोलावलं. यांचं नाव ( सुरजच्या आईचं नाव ) असं काय आहे? मी म्हटलं, यांचं नावं मालन द्दत्त चव्हाण आहे. जेव्हा सुरज झाला त्याला घरी आणलं. तेव्हा माझा भाऊ घरात पिऊन पडला होता.”