Bigg Boss Marathi Seaosn 5: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेले स्पर्धक सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. हे स्पर्धेक शोबाहेर आल्यापासून एकमेकांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. अशातच वैभव चव्हाण आणि इरिना रुडाकोवालाच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं असून नेटकरी दोघांना लग्न करण्याचा सल्ला देत आहेत.
इरिना रुडाकोवाने “नुसतं मराठी” असं कॅप्शन लिहित वैभव चव्हाणबरोबर एक व्हिडीओ २८, ऑक्टोबरला शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये इरिनाने नऊवारी साडी नेसलेली दिसत आहे. नाकात नथ, गळ्यात चोकर, हातात बांगड्या, कपाळावर टिकली अशा मराठमोळ्या सुंदर लूकमध्ये इरिना पाहायला मिळत आहे. तर वैभव इरिनासह व्हिडीओ काढताना दिसत आहे. दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
हेही वाचा – पृथ्वीक प्रतापनंतर ‘हा’ लोकप्रिय मराठी अभिनेता लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नाची तारीख विचारताच म्हणाला…
नेटकरी इरिनाच्या लूकचं जितकं कौतुक करत आहेत. तितकंच इरिना आणि वैभव या जोडीचं कौतुक होतं आहे. “लवकर लग्न करा”, “आम्हाला हिच वहिनी पाहिजे”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
एक नेटकऱ्याने लिहिलं आहे, “वैभव-इरिना लग्न करा. तुमची खूप छान जोडी दिसेल. तुमचे विचार पण एक होतं आहेत. इरिना तुला वैभव खूप जीव लावेल.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “भावा आपल्याला आता हिच वहिनी पाहिजे.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, भावा लग्न कर हिच्याबरोबर, वहिनी खूप मस्त आहे.
हेही वाचा – Bigg Boss 18: चाहत पांडेमुळे रजत दलाल आणि अविनाश मिश्रामध्ये जोरदार भांडण, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपल्यापासून इरिना आणि वैभव चव्हाण सतत एकत्र पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी दोघं एकत्र विजेता सूरज चव्हाणच्या गावी गेले होते. त्यानंतर धनंजय पोवारच्याही घरीदेखील दोघं एकत्र दिसले होते.
© IE Online Media Services (P) Ltd