सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळी गाणी ट्रेंड होतं असतात. या ट्रेंडिंग गाण्यावर युजर्ससह कलाकार मंडळी डान्स व्हिडीओ करत असतात. सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानने गायलेलं ‘आंख’ गाणं खूप ट्रेंड होतं आहे. या गाण्यात सुनिधी चौहानने अभिनेत्री सान्या मल्होत्राबरोबर जबरदस्त डान्स केला आहे. दोघींच्या डान्सचं खूप कौतुक होतं आहे. दोघींना नेटकरी भारताची शकीरा आणि बेयॉन्से म्हणतं आहेत. ‘आंख’ या गाण्यातील हूकस्टेपने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सर्वजण या गाण्यातील हूकस्टेप करताना दिसत आहेत.

नुकतंच या गाण्यावर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेली योगिता चव्हाणने जबरदस्त डान्स केला आहे. योगिता चव्हाण ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी ती ट्रेंड फॉल करत असते. तसंच तिने ‘आंख’ या गाण्याचा ट्रेंड फॉल करत त्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

हेही वाचा – ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील लतिका आणि अभिमन्यू पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस; कधी, कुठे जाणून घ्या…

योगिता चव्हाणचा ‘आंख’ गाण्यावरील डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. तिच्या या जबरदस्त डान्सचं इतर कलाकारांनी कौतुक केलं आहे. २० लाखांहून अधिक जणांना तिचा हा व्हिडीओ पाहायला असून ४८ हजारांहून अधिक जणांनी लाइक केलं आहे. तर पाचशेहून अधिक जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम साक्षी गांधीने ‘या’ अभिनेत्यासाठी लिहिली खास पोस्ट; म्हणाली, “३३ वेळा लिहून, खोडून…”

योगिताच्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. “तू येडी झाली का?”, “हे काय खुळ्यागत”, “योगिता ताई तुम्हाला शोभत नाही”, “खरंच खूप बकवास वाटतं आहे. तुम्ही व्हिडीओ पोस्ट करण्याआधी स्वतःला पण विचारत जा की हा व्हिडीओ कसा वाटतोय”, “हे सगळं ‘बिग बॉस’मध्ये दाखवायचं होतं…बरेच दिवस टिकली असती”, “बाई हा काय प्रकार”, असा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

Comments
Comments

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव अमेरिकेतील चाहतीचं ‘ते’ कृत्य पाहून भारावली, किस्सा सांगत म्हणाली, “तिने माझ्या हातात…”

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेले सदस्य सध्या एकमेकांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. तसंच विविध कार्यक्रमांमध्ये या सदस्यांना पाहुणे म्हणून आमंत्रित करत आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात पाहायला मिळालेले सदस्य चर्चेत आहेत. यांचे फोटो, व्हिडीओ सातत्याने सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी’मधील कलाकारांचा नवा शो येत असल्याचं समोर आलं आहे.

Story img Loader