‘जीव माझा गुंतला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंतरा म्हणजे अभिनेत्री योगिता चव्हाण ‘बिग बॉस मराठी’मुळे प्रसिद्धीझोतात आली. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात योगिता चव्हाण झळकली होती. अभिनेता सौरभ चौघुलेबरोबर लग्न केल्यानंतर सात महिन्यांनी योगिता ‘बिग बॉस मराठी’मध्ये पाहायला मिळाली. पण या वादग्रस्त शोमध्ये तिचा जास्त काळ टिकाव लागला नाही. काही दिवसांत योगिता घराबाहेर झाली. पण, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे अभिनेत्रीला अधिक लोकप्रियता मिळाली. त्यामुळे ती नेहमी चर्चेत असते.
अभिनेत्री योगिता चव्हाण सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी सोशल मीडियावरील ट्रेंड फॉलो करत असते. तिचे डान्स व्हिडीओ कायम चर्चेचा विषय असतो. काही दिवसांपूर्वीच तिने ‘मला लागली कुणाची उचकी’ गाण्यावर लावणी सादर केली होती. तिचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला आहे.
हेही वाचा – लगीनघाई! ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीचा ग्रहमख विधी पार पडला, फोटो आले समोर
“नृत्याचं एक रंग, लावणीचं ठेका!”, असं कॅप्शन लिहित योगिता चव्हाणने लावणीचा व्हिडीओ शेअर केला होता. यामधील तिने सादर केलेल्या लावणीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचं नृत्य, अदा याचं इतर कलाकार मंडळींसह नेटकरी भरभरून कौतुक करत आहेत.
योगिताने सादर केलेली लावणी पाहून एका नेटकऱ्याने प्रतिक्रियेत लिहिलं, “तू इतकी हरहुन्नरी आहेस, मग ‘बिग बॉस’मध्ये इतकी साधी का राहत होतीस?” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “तुला ‘फुलवंती’ चित्रपटामध्ये घ्यायला हवं होतं. नृत्य, अदा आणि सगळं एकदम परफेक्ट आहे.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, तुझं नृत्य बघत असताना अजिबात डोळे बंद होतं नाहीत. कडक.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “आईशप्पथ! मराठीची दीपिका पादुकोण.”
हेही वाचा – Video: पूजा सावंतने भावाच्या संगीत सोहळ्यात धरला ठेका, भावंडांसह केला जबरदस्त डान्स
योगिता चव्हाणच्या या लावणीची भुरळ अभिनेत्री हेमांगी कवीला पडली. तिने देखील योगिताची लावणी पाहून ‘मला लागली कुणाची उचकी’ गाण्यावर नृत्य केलं. त्याचा व्हिडीओ हेमांगीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
हेही वाचा – Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीच्या मते करणवीर मेहरा नाही, तर ‘हा’ सदस्य होणार विजयी; म्हणाला…
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेले सदस्य सध्या एकमेकांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. तसंच विविध कार्यक्रमांमध्ये या सदस्यांना पाहुणे म्हणून आमंत्रित करत आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात पाहायला मिळालेले सदस्य चर्चेत आहेत. यांचे फोटो, व्हिडीओ सातत्याने सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी’मधील कलाकारांचा नवा शो येत असल्याचं समोर आलं आहे.