Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सध्या चौथा आठवडा सुरू आहे. या चौथ्या आठवड्याला देखील दमदार सुरुवात झाली आहे. बीबी करन्सी कमवण्यासाठी ‘सत्याचा पंचनामा’ हा टास्क सुरू आहे. ‘ए टीम’मध्ये निक्की, जान्हवी, अरबाज, विशाल, इरिना, घनःश्याम, वैभव, सूरज आहे. तर ‘बी टीम’मध्ये अभिजीत, अंकिता, धनंजय, पंढरीनाथ, आर्या आणि वर्षा उसगांवकर आहेत. या दोन्ही टीममध्ये सत्य-असत्याचा एक रंजक खेळ सुरू आहे. बीबी करन्सी जिंकण्याची संधी या टास्कमधून देण्यात आली आहे. पण अजूनपर्यंत या टास्कमध्ये दोन्ही टीमने बीबी करन्सी जिंकली नाहीये. अशातच या टास्कदरम्यानचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये ‘ए टीम’मध्ये फूट पडल्याचं दिसत आहे.

‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस’चा ( Bigg Boss Marathi ) नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये ‘ए टीम’मधील सदस्यांमध्ये वाद झालेले पाहायला मिळत आहे. निक्कीच्या एका निर्णयावरून हा वाद झाल्याचं दिसत आहे. वैभव व घनःश्यामने निक्कीच्या निर्णयामुळे तिच्या विरोधात आवाज उठवला आहे.

kokan hearted girl return to kokan with fiance kunal bhagat
Video : होणाऱ्या नवऱ्यासह अंकिता पोहोचली कोकणात! आईला मारली घट्ट मिठी; औक्षण झाल्यावर म्हणाली, “आता Bigg Boss…”
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Bigg Boss 18 Muskan Bamne is EVICTED from the salman khan show
Bigg Boss 18 : हेमा शर्मानंतर रातोरात ‘या’ सदस्याला सलमान खानच्या शोमधून दाखवला बाहेरचा रस्ता, नेटकरी म्हणाले, “योग्य निर्णय”
netizens reaction on Bigg Boss Marathi 5 Grand Finale
Bigg Boss Marathi चा ग्रँड फिनाले पुन्हा रंगणार, नेटकरी म्हणाले, “केवळ हिंदीसाठी झुकलात…”
Bigg Boss Marathi 5 Grand Finale on public demand
Bigg Boss Marathi 5 चा ग्रँड फिनाले पुन्हा रंगणार! कलर्सने केली मोठी घोषणा; कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या
Bigg Boss 18 karan veer Mehra refuses to sacrifice his belongings for ration
Bigg Boss 18: “अविनाशच्या अहंकारासाठी मी…”, रेशनसाठी करणवीर मेहराने घेतली ठाम भूमिका; नेटकरी कौतुक करत म्हणाले…
Bigg Boss Marathi Season 5 Fame Nikhil damle dance video viral
Video : “बिग बॉस मराठीमध्ये तुला काय झालेलं?” निखिल दामलेचा जबरदस्त डान्स पाहून नेटकरी झाले थक्क, म्हणाले…
Bigg Boss marathi season 5 winner suraj Chavan share first reel video
Video: ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणने केला पहिला Reel व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, “अभिजीत सावंतची आठवण येतेय का?”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे सातव्या वर्षात पदार्पण, कलाकार खास पोस्ट करत म्हणाले, “अजून ही हवेत न उडता..”

प्रोमोमध्ये पंचनामा खोलीत वर्षा उसगांवकर पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासंबंधित ‘बिग बॉस’ने ( Bigg Boss Marathi ) केलेल्या विधानाला निक्कीने सहमती दर्शवली आहे. त्यामुळेच वैभव व घनःश्याम चिडलेले दिसत आहेत. वैभव म्हणतो की, निक्कीसाठी मी कुठलीही साथ देणार नाहीये. त्यानंतर निक्की हिरवा बजर दाबण्यापूर्वी म्हणताना दिसतेय की, मी माझ्या मतावर ठाम आहे. मी हिरवा बजर दाबते. तिच्या याच निर्णयावरून वैभव म्हणतो, “तू थेट तुझं-तुझं मत मांडलंय.” घनःश्याम देखील म्हणतो, “तिच्या अशा वागण्यामुळे टीमचा घात होऊ शकतो.” त्यामुळे आता ‘ए टीम’मध्ये हा वाद निक्कीच्या कोणत्या निर्णयामुळे झालाय? निक्कीने वर्षा उसगांवकरांच्या कोणत्या विधानाला सहमती दर्शवली? हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – अश्विनी एकबोटेंचा मुलगा शुभंकर झळकणार विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटात, टीझर शेअर करत म्हणाला…

सत्याचा पंचनामा टास्क नेमका काय आहे?

चौथ्या आठवड्यातील पहिल्या टास्कमध्ये एक पंचनामा खोली आहे. त्या खोलीमध्ये दोन्ही टीममधील एक-एक सदस्याला पाठवून त्या सदस्यासंबंधित ‘बिग बॉस’कडून ( Bigg Boss Marathi ) एक विधान केलं जात आहे. त्या सदस्याने ते विधान खरं की खोटं हे सांगायचं. त्याच वेळेला विरोधी टीमने ठरवायचं आहे की, पंचनामा खोलीत असलेला सदस्य खरं बोलतं आहे की खोटं? यासाठी विरोधी टीममध्ये आपापसात चर्चा करायची आहे. जर विरोधी टीम पंचनामा खोलीत असलेल्या सदस्याच्या मताशी सहमत असेल तर त्यांनी ते जाहीर करून हिरवा बजर दाबायचा आहे. सहमत नसतील तर लाल बजर दाबायचा आहे. पण यात एक ट्विस्ट आहे. जर विरोधी टीम पंचनामा खोलीत असलेल्या सदस्याशी सहमत असेल तर त्या सदस्याच्या टीमला २० हजार बीबी करन्सी मिळणार. जर विरोधी टीम पंचनामा खोलीतील सदस्याशी सहमत नसेल तर तो सदस्य रिकाम्या हाती बाहेर येत आहे. आतापर्यंत दोन्ही टीममधील एक-एक सदस्य गेले होते जे रिकाम्या हाती बाहेर आलेत. आता पुढे काय होतं? कोण अधिक बीबी करन्सी जिंकतं? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.