Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला नुकतीच सुरुवात झाली आहे. २८ जुलैला या शोचा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला अन् घरात एकूण १६ स्पर्धकांनी एन्ट्री घेतली. ‘बिग बॉस’चं घर म्हटलं की, राडा, भांडण, मस्ती, धमाल, विविध टास्क या गोष्टी आल्याच…अशातच आता नव्या पर्वात वादाची पहिली ठिणगी पडून खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात झाली आहे.

‘बिग बॉस’ने यंदा बीबी करन्सी हा नवीन प्रकार सुरु केला आहे. या करन्सीचा वापर करून घरात सुख-सुविधांचा लाभ घेता येणार आहे. पहिल्याच दिवशी सकाळी उठल्यावर स्पर्धकांसमोर एक मोठा पेच उभा राहिला होता. घरातलं सगळं पाणी बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे सहभागी सदस्यांना अंघोळ करायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता. अशाप्रकारे क्षणाक्षणाला या स्पर्धकांची परीक्षा घेण्यात येणार आहे. घरात पाणी आल्यावर १६ जणांची तयारी करण्यासाठी धावपळ होते. अशातच ‘बिग बॉस’ सर्व स्पर्धकांना लिव्हिंग एरियामध्ये एकत्र जमायला सांगतात.

People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Woman police officer abused for not taking action on vehicle
पिंपरी : कारवाई करू नये म्हणून महिला पोलिसाला शिवीगाळ
husband wife conversation home report joke
हास्यतरंग : आईच्या घरी…
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
girlfriend boyfriend conversation fasting another woman search joke
हास्यतरंग : जेवण करून…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…

हेही वाचा : Bigg Boss Marathi : यंदाची थीम, ‘बिग बॉस’ करन्सी ते Dilemma! स्पर्धकांसाठी कोणते ट्विस्ट येणार? जाणून घ्या…

Bigg Boss च्या घरात वाद

‘बिग बॉस मराठी’च्या सीझनच्या सगळ्यात ज्येष्ठ स्पर्धक वर्षा उसगांवकर यांना मेकअपमुळे लिव्हिंग एरियामध्ये पोहोचण्यास विलंब होतो. त्यामुळे निक्की त्यांना बोलवण्यासाठी बेडरुममध्ये येते…यावेळी वर्षा मेकअप करत असतात. निक्की त्यांना चिडून “आता लिपस्टिक लावू नका…नंतर लावा लवकर या…सगळे वाट बघत आहेत” असं सांगते. यावर वर्षा ताई “तुझी तयारी झालेली आहे…मी आलेच, पाणी नव्हतं त्यानंतर फ्रेश होण्यासाठी अजून कोणीतरी गेलं होतं” असं सांगतात. निक्की वैतागून बाहेर येऊन इतर सदस्यांबरोबर सोफ्यावर डोक्यावर हात लावून बसते. याठिकाणी इतर स्पर्धक सुद्धा मेकअप करणाऱ्या वर्षा उसगांवकरांना आवाज देऊन “ताई प्लीज लवकर बाहेर या…आम्ही सुद्धा असेच बसलोय” असं सांगतात. तर, घरातील आणखी एक सदस्य “ताई बिग बॉससाठी बाहेर या…त्यांचा खोळंबा होतोय” असं म्हणत असल्याचं या नव्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

एकंदर वर्षा उसगांवकरांच्या मेकअपमुळे घरात वादाची पहिली ठिणगी पडणार आहे. आता घरात प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागल्यावर स्पर्धकांची कशी तारांबळ उडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi: रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी’ होस्ट करण्यासाठी होकार दिल्यावर ‘अशी’ होती पत्नी जिनिलीयाची प्रतिक्रिया

varsha
Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकर ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी )

दरम्यान, यंदाचं पर्व अभिनेता रितेश देशमुख होस्ट करणार असून यावर्षी एकूण १६ स्पर्धक घरात सहभागी झाले आहे. ‘कलर्स मराठी वाहिनी’वर रोज रात्री ९ वाजता ‘बिग बॉस’च्या नव्या भागाचं प्रसारण करण्यात येईल. तर, स्पर्धक जिओ सिनेमावर हा शो लाइव्ह पाहू शकतात.

Story img Loader