Bigg Boss Marathi Season 5 Updates : ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाची गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाविश्वात प्रचंड चर्चा चालू आहे. यंदाच्या पर्वाचं होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. यावर्षीच्या ‘बिग बॉस’मध्ये प्रेक्षकांना बरेच बदल पाहायला मिळतील. त्यामुळे रितेश देशमुख होस्टिंगची जबाबदारी कशी निभावतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच आता ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेणाऱ्या पहिल्या दोन स्पर्धकांचा प्रोमो वाहिनीने इन्टाग्रामवर शेअर केला आहे.

‘बिग बॉस मराठी’मध्ये यावर्षी स्पर्धक म्हणून कोण सहभागी होणार याची उत्सुकता सर्वत्र निर्माण झालेली आहे. अशातच ‘कलर्स मराठी’ वाहिनीकडून घरात एन्ट्री घेणाऱ्या पहिल्या दोन स्पर्धकांचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यातील पहिल्या प्रोमोमध्ये एक गायक ‘राधा ही बावरी’ हे लोकप्रिय गाणं परफॉर्मन्स म्हणून सादर करत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा स्पर्धक ‘राधा ही बावरी’ गाणं गात असल्याने सुरुवातीला नेटकऱ्यांना हा स्पर्धक स्वप्नील बांदोडकर तर नाही ना? असं वाटलं होतं मात्र, संबंधित स्पर्धकाच्या हातातील अंगठ्या व एकंदर अंगशैली पाहून हा गायक अभिजीत सावंत असावा अशा चर्चांना उधाण आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : अखेर तो क्षण आलाच! प्रतिमा अन् रविराज किल्लेदार आले समोरासमोर पण…; पाहा मालिकेचा नवीन प्रोमो

Bigg Boss Marathi मध्ये स्पर्धक म्हणून कोण सहभागी होणार?

मराठीसह हिंदी कलाविश्वात अभिजीत सावंत लोकप्रिय आहे. त्याने इंडियन आयडॉल कार्यक्रमाचं पहिलंच पर्व जिंकलं आहे. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर अभिजीत सावंत अशा कमेंट्स करत अभिनेत्याला यामध्ये टॅग केलं आहे. अभिजीतने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे हा स्पर्धक खरंच अभिजीत असेल की दुसरं कोणी हे प्रेक्षकांना प्रत्यक्ष ग्रँड प्रीमियर सोहळा प्रदर्शित झाल्यावर समजणार आहे.

bb5
Bigg Boss Marathi

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात यावर्षी पहिल्यांदाच एक परदेशी पाहुणी सहभागी होणार आहे. “पहिल्यांदाच येतेय एक परदेसी गर्ल…” असं कॅप्शन देत वाहिनीकडून एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. हिला अद्याप जास्त नेटकरी ओळखू शकलेले नाहीत. मात्र, अनेकांनी या प्रोमोवर इरिना रुडाकोवा अशी कमेंट केली आहे. त्यामुळे आता ही परदेसी गर्ल नेमकी कोण असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने घेतली पहिली गाडी! सोबतीला होते आई अन् कुटुंबीय; म्हणाला, “संयमाची चार चाके…”

दरम्यान, ‘Bigg Boss Marathi’चा ग्रँड प्रीमियर २८ जुलैला रात्री ९ वाजता पार पडणार आहे. या सोहळ्यात यंदा शोमध्ये कोणकोणते कलाकार सहभागी होणार याचा उलगडा होणार आहे. हा पाचवा सीझन प्रेक्षकांना दररोज रात्री ९ वाजता ‘कलर्स मराठी वाहिनी’वर व ‘जिओ सिनेमा’वर पाहता येणार आहे.

Story img Loader