Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner Live : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व यंदा २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं. दरवर्षी हा शो शंभर दिवस प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. मात्र, यावर्षी अवघ्या ७० दिवसांमध्ये पाचव्या पर्वाचा महाविजेता घोषित केला जाणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये एकूण १६ स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या चक्रव्यूहात सहभाग घेतला होता. या १६ जणांपैकी अनेक अडचणींवर मात करून फक्त सहा जणांचा घरात शेवटपर्यंत निभाव लागला.

प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवत यंदा अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अंकिता प्रभू वालावलकर, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर या सहा सदस्यांनी ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली होती. ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले सध्या दणक्यात सुरू आहे. आतापर्यंत जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी या सदस्यांनी या खेळातून निरोप घेतला आहे. त्यामुळे यंदाचे टॉप-२ ठरले सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत. यानंतर दोघांनी घराचे दिवे बंद करून मंचावर एन्ट्री घेतली. शेवटी रितेश देशमुखने सूरज चव्हाण यंदाचा विजेता झाल्याचं जाहीर केलं.

Live Updates

Riteish Deshmukh Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Live Today, 06 October 2024 | 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा विजेता ठरला सूरज चव्हाण

22:27 (IST) 6 Oct 2024
सूरजचं अभिनंदन करण्यासाठी Bigg Boss च्या सेटवर पोहोचली जिनिलीया देशमुख! 'तो' फोटो आला समोर

सूरजचं अभिनंदन करण्यासाठी जिनिलीया देशमुख आज ग्रँड फिनालेला उपस्थित होती. याचा खास फोटो मुश्ताक शेखने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सूरज, रितेश-जिनिलीया, केदार शिंदे यांनी एकत्र काढलेला हा सेल्फी फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/DAyjdxdz15p/?utm_source=ig_web_copy_link

21:45 (IST) 6 Oct 2024
Bigg Boss 18 : हिंदी पर्वाच्या ग्रँड प्रिमियरला दणक्यात सुरुवात

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाची सांगता झाल्यावर हिंदी पर्वाला सुरुवात

( सविस्तर अपडेट्स वाचा )

20:58 (IST) 6 Oct 2024
'गुलीगत धोका' म्हणत सूरज चव्हाण ठरला पाचव्या पर्वाचा महाविजेता!

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला आहे सूरज चव्हाण

https://www.instagram.com/reel/DAyZ4gwoi_P/?utm_source=ig_web_copy_link

20:48 (IST) 6 Oct 2024
Bigg Boss कडून शेवटचा आदेश...; सूरज झाला भावुक

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale : बिग बॉस शेवटच्या क्षणाला म्हणाले, "Bigg Boss आदेश देत आहेत की, सूरज आणि अभिजीत आपण घराचे दिवे बंद करून तसेच आपल्या नावांच्या पाट्या घेऊन या घराचा निरोप घ्यावा..." घरातून दिवे बंद करून बाहेर पडताना सूरज प्रचंड भावुक झाला होता.

https://www.instagram.com/p/DAyYDd0I_zX/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

20:35 (IST) 6 Oct 2024
निक्की तांबोळी Eliminate! ७० दिवसांनी घराबाहेर, टॉप-२ ठरले...

ग्रँड फिनालेच्या शर्यतीतून निक्की तांबोळी बाहेर आली आहे. त्यामुळे यंदाचे टॉप-२ स्पर्धक ठरले आहेत अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण

https://www.instagram.com/p/DAyXkVmos5f/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

20:25 (IST) 6 Oct 2024
Bigg Boss Marathi : पाचव्या पर्वाला मिळाले टॉप-३ Finalist! तर 'हे' तीन सदस्य झाले घराबाहेर

'बिग बॉस मराठी'चा ग्रँड फिनाले सध्या दणक्यात सुरू आहे. आतापर्यंत जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार या सदस्यांनी या खेळातून निरोप घेतला आहे. तर, यंदाचे टॉप-३ स्पर्धक ठरले आहेत...

टॉप-३ स्पर्धक

निक्की तांबोळी

सूरज चव्हाण

अभिजीत सावंत

https://www.instagram.com/p/DAyTac5Ty4K/?igsh=MTQyMTNvYm0zY3F3bQ==

20:13 (IST) 6 Oct 2024
"बिग बॉस मराठीचा टीआरपी ऐकला अन्...", ग्रँड फिनालेमध्ये आलिया भट्टची एन्ट्री; म्हणाली...

'जिगरा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया भट्ट 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेला आली होती. यावेळी ती म्हणाली, "आम्ही चित्रपटाच्या प्रमोशनबद्दल विचार करत होतो. तेव्हा आम्ही बिग बॉस मराठीचा टीआरपी ऐकला अन् बोजा गुंडाळून इथे यायचं आम्ही ठरवलं आणि सर्वात महत्त्वाचं रितेश तुम्ही हा शो एकदम 'लय भारी' होस्ट केला आहे."

https://www.instagram.com/reel/DAyU4wxNopK/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

19:57 (IST) 6 Oct 2024
धनंजय पोवार घरातून Eliminate! घरात यंदाच्या पर्वात पहिल्यांदाच पार पडलं 'असं' Eviction

'बिग बॉस'च्या घरातून धनंजय पोवार Eliminate झाला आहे. प्रेक्षकांची कमी मतं मिळाल्याने त्याचा प्रवास संपला. यावेळी घरात कुटुंबीय देखील उपस्थित होते. गार्डन एरियामध्ये एक-एक करून रितेशने प्रत्येकाच्या कुटुंबीयांना envelope उघडायला लावलं. यावेळी डीपीच्या पत्नी कल्याणी यांनी कार्ड ओपन केल्यावर त्यात Eliminated लिहिलं होतं.

19:41 (IST) 6 Oct 2024
Bigg Boss Marathi : ग्रँड फिनालेतून दुसरं Eviction! अंकिता घराबाहेर, टॉप - ४ स्पर्धक ठरले...

अंकिता प्रभू वालावलकर म्हणजेच 'कोकण हार्टेड गर्ल'चं 'बिग बॉस'च्या घरातून एव्हिक्शन झालेलं आहे. त्यामुळे सूरज, धनंजय, अभिजीत आणि निक्की हे यंदाचे टॉप-४ स्पर्धक ठरले आहेत.

https://www.instagram.com/p/DAyRpuSNR7W/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

19:20 (IST) 6 Oct 2024
Bigg Boss साठी इरिनाने घेतला मराठीतून उखाणा

रितेशच्या सांगण्यावरून इरिना उखाणा घेत म्हणाली, "वैभवला भरवला पुरणपोळीचा घास! पण, माझा श्वास, माझा ध्यास फक्त 'बिग बॉस"

19:02 (IST) 6 Oct 2024
ट्रॉफी न घेता जान्हवीने घेतली खेळातून एक्झिट! Money Bag उचलून कमावले तब्बल 'एवढे' लाख

जान्हवीने ९ लाखांची पैशांची बॅग उचलून खेळातून माघार घेतली आहे.

जान्हवी भावुक होत म्हणाली, "मी उद्धट बोलले, मोठ्यांचा अपमान केला. मला माहितीये की, लोकांचा राग शांत झालेला नाहीये. हा गेम आहे आणि हा बिग बॉसने दिलेला एक टास्क आहे. टास्क पूर्ण नाही केला, तर बिग बॉस चिडतात. मी प्रायश्चित म्हणून हा बझर वाजवते आणि हा खेळ सोडते."

18:54 (IST) 6 Oct 2024
Bigg Boss Marathi : ग्रँड फिनालेला 'हा' सदस्य राहिला गैरहजर

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात यंदा एकूण १७ (वाइल्ड कार्ड पकडून) स्पर्धकांनी प्रवेश घेतला होता. सध्या टॉप-६ स्पर्धकांमध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरशीची लढत सुरू आहे. या सोहळ्याला घरातून बाहेर पडलेल्या सगळ्या सदस्यांनी उपस्थिती लावली आहे. मात्र, यात आर्या अनुपस्थित आहे. आर्या जाधवला निक्कीला कानाखाली मारल्याने घराबाहेर पाठवण्यात आलं होतं. त्यामुळे रियुनियनला सुद्धा ती घरात आली नव्हती आणि आता महाअंतिम सोहळ्याला देखील आर्या गैरहजर आहे.

18:43 (IST) 6 Oct 2024
Bigg Boss Marathi : ग्रँड फिनालेमध्ये दिसली सलमान खानची झलक!

ग्रँड फिनालेमध्ये दिसली सलमान खानची झलक! रितेशसाठी खास मराठीतून पाठवला मेसेज; भाईजान म्हणाला, "काय भाऊ…"

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाला मिळालेलं यश पाहून सलमान खानने रितेशचं कौतुक केलं आहे. भाईजान रितेशशी मराठीतून संवाद साधत म्हणाला, "रितेश भाऊ काय लय भारी होता यावर्षीचा बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन...एक नंबर होस्टिंग झाली. तुम्ही सर्वांना 'वेड' लावलं. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा! आता सर्वांना सांगा आजपासून बिग बॉसचं हिंदी पर्व सुद्धा आवर्जुन पाहा"

18:20 (IST) 6 Oct 2024
Bigg Boss Marathi : रितेशने केलं टॉप-६ स्पर्धकांचं कौतुक

रितेशने सूरज, निक्की, अभिजीत, जान्हवी, डीपी, अंकिता या सहा फायनलिस्टचं कौतुक केलं आहे. 'फॅमिली वीक' टास्क पाहून प्रचंड भावुक व्हायला झालं असंही अभिनेत्याने यावेळी सांगितलं.

"माझ्या पहिल्या सीझनला तुम्ही एवढं खास केलं यासाठी मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो." असं देखील रितेश यावेळी म्हणाला.

18:09 (IST) 6 Oct 2024
रितेश देशमुखने मागितली महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची जाहीर माफी! नेमकं कारण काय?

गेल्या दोन आठवड्यांपासून रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर उपस्थित राहू शकला नव्हता. त्यामुळे त्याने महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची माफी मागितली आहे. रितेश म्हणाला, "हा शो माझ्या खूप जवळचा आहे आणि मला सर्वांनी दोन आठवडे समजून घेतलं यासाठी खूप खूप आभारी आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागतो. आता मी शूटिंग थांबवून खास आजच्या सोहळ्यासाठी इथे आलो आहे."

18:01 (IST) 6 Oct 2024
Bigg Boss Marathi - अखेर 'तो' क्षण आलाच! ग्रँड फिनालेला दणक्यात सुरुवात, रितेश देशमुखचा जबरदस्त परफॉर्मन्स

भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख दोन आठवड्यांनी परतला. जबरदस्त डान्स करत मंचावर घेतली एन्ट्री

https://www.instagram.com/reel/DAyEYTwtJAe/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

17:49 (IST) 6 Oct 2024
ग्रँड फिनालेआधी अरबाजचा निक्कीसाठी खास मेसेज; चाहत्यांना म्हणाला, "काही करून..."

अरबाज त्याच्या इन्स्टाग्राम ब्रॉडकास्टमध्ये चाहत्यांना विनंती करत म्हणतो, "आज फिनाले आहे... आणि मी तुम्हाला विनंती करतो की, जर रात्री लाइव्ह वोटिंग सुरू झालं तर, निक्कीला जिंकवण्याची ही आपल्याकडे शेवटची संधी आहे. तिला भरभरून सपोर्ट करा...आणि जर लाइव्ह वोटिंग सुरू झालं तर, तिला वोट करा. काही करून निक्कीच्या हातात 'बिग बॉस'ची ट्रॉफी आली पाहिजे."

17:18 (IST) 6 Oct 2024
सूरज चव्हाणला धक्का! वोटिंगमध्ये निक्की आघाडीवर; ग्रँड फिनालेमध्ये काय घडणार?

सध्याच्या वोटिंग ट्रेंडनुसार निक्कीने सूरजसह अन्य सदस्यांना मागे टाकल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर निक्कीचे चाहते याबद्दल आनंद व्यक्त करताना दिसत आहे. एवढे दिवस तिसऱ्या क्रमांकावर असणारी निक्की...अभिजीत अन् सूरजला मागे काढत आता आघाडीवर आहे.

https://x.com/Raqeshfan/status/1842893384773521426

16:35 (IST) 6 Oct 2024
Bigg Boss Marathi : अंकिता वालावलकर आणि धनंजय Evicted?

Bigg Boss Marathi Grand Finale : अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार Evicted? टॉप-३ मध्ये स्थान नाही, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

समोर आलेल्या माहितीनुसार अंकिता प्रभु-वालावलकर आणि धनंजय पोवार यांना टॉप-३ मध्ये स्थान मिळालेलं नाही. या दोघांनी खेळाचा निरोप घेतला आहे. तर, जान्हवीने पैशांची बॅग उचलून खेळ सोडल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडिया सुरू आहेत. आता ग्रँड फिनाले सुरू झाल्यावर संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

पाहा नेटकऱ्यांच्या पोस्ट

https://www.instagram.com/reel/DAx1JenOgHK/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

16:18 (IST) 6 Oct 2024
Bigg Boss Marathi चा विजेता किती लाख जिंकणार?

Bigg Boss Marathi च्या विजेत्याला मिळणार 'इतक्या' लाखांचं बक्षीस! ट्रॉफीसह किती धनराशी घेऊन जाणार?

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले आज पार पडणार आहे. महाचक्रव्यूह टास्कमध्ये बक्षीसाची रक्कम गमावल्याने विजेत्या सदस्याला यावर्षी झगमगत्या ट्रॉफीसह १४.६ लाख एवढी धनराशी मिळणार आहे.

15:13 (IST) 6 Oct 2024
यंदा Money Bag उचलून कोण घराबाहेर पडणार? सोशल मीडियावर 'या' सदस्याच्या नावाची चर्चा

दरवर्षी अंतिम फेरीत Money Bag उचलून एका सदस्याला घराबाहेर पडण्याची संधी मिळते. या टास्कमध्ये स्पर्धकांना जास्तीत जास्त रक्कम जिंकण्याची संधी असते. यंदा ही Money Bag उचलून चौथ्या क्रमांकावर जान्हवीने या स्पर्धेतून माघार घेतल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

पाहा पोस्ट

15:07 (IST) 6 Oct 2024
Bigg Boss Marathi - Grand Finale ची पहिली झलक! सूरज-अभिजीतचा भन्नाट डान्स

Grand Finale ची पहिली झलक! सूरज अन् अभिजीतचा ‘झापुक झुपूक’ म्हणत जबरदस्त डान्स

( सविस्तर वृत्त वाचा )

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DAvfK7Gt0v3/?utm_source=ig_web_copy_link

14:42 (IST) 6 Oct 2024
Bigg Boss Marathi Grand Finale कुठे पाहता येणार?

Bigg Boss Marathi 5 : उरले फक्त काही तास! ग्रँड फिनाले विनामूल्य कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या

( सविस्तर वृत्त वाचा )

14:37 (IST) 6 Oct 2024
Bigg Boss Bhaucha Dhakka - रितेश देशमुखचं भाऊच्या धक्क्यावर कमबॅक, व्हिडीओ व्हायरल

दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर रितेश देशमुख पुन्हा भाऊच्या धक्क्यावर ग्रँड फिनालेसाठी परतला…; व्हिडीओ व्हायरल

( सविस्तर वृत्त वाचा )

https://www.instagram.com/p/DAvzzMUCAYr/?utm_source=ig_web_copy_link

 

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Live Updates in Marathi

बिग बॉस मराठी सीझन ५ ग्रँड फिनाले लाईव्ह अपडेट्स

Story img Loader