Bigg Boss Marathi 5 Grand Finale Live Updates : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व यंदा २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं. दरवर्षी हा शो शंभर दिवस प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. मात्र, यावर्षी अवघ्या ७० दिवसांमध्ये पाचव्या पर्वाचा महाविजेता घोषित केला जाणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये एकूण १६ स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या चक्रव्यूहात सहभाग घेतला होता. या १६ जणांपैकी अनेक अडचणींवर मात करून फक्त सहा जणांचा घरात शेवटपर्यंत निभाव लागला.

प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवत यंदा अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अंकिता प्रभू वालावलकर, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर या सहा सदस्यांनी ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली. आता यांच्यापैकी शेवटच्या क्षणी बाजी मारत ‘बिग बॉस मराठी’च्या झगमगत्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Live Updates

Riteish Deshmukh Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Live Today, 06 October 2024 | ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा विजेता कोण होणार?

16:35 (IST) 6 Oct 2024
Bigg Boss Marathi : अंकिता वालावलकर आणि धनंजय Evicted?

Bigg Boss Marathi Grand Finale : अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार Evicted? टॉप-३ मध्ये स्थान नाही, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

समोर आलेल्या माहितीनुसार अंकिता प्रभु-वालावलकर आणि धनंजय पोवार यांना टॉप-३ मध्ये स्थान मिळालेलं नाही. या दोघांनी खेळाचा निरोप घेतला आहे. तर, जान्हवीने पैशांची बॅग उचलून खेळ सोडल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडिया सुरू आहेत. आता ग्रँड फिनाले सुरू झाल्यावर संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

पाहा नेटकऱ्यांच्या पोस्ट

16:18 (IST) 6 Oct 2024
Bigg Boss Marathi चा विजेता किती लाख जिंकणार?

Bigg Boss Marathi च्या विजेत्याला मिळणार ‘इतक्या’ लाखांचं बक्षीस! ट्रॉफीसह किती धनराशी घेऊन जाणार?

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले आज पार पडणार आहे. महाचक्रव्यूह टास्कमध्ये बक्षीसाची रक्कम गमावल्याने विजेत्या सदस्याला यावर्षी झगमगत्या ट्रॉफीसह १४.६ लाख एवढी धनराशी मिळणार आहे.

16:11 (IST) 6 Oct 2024
Bigg Boss Marathi 5 : विजेत्याला मिळणार ‘ही’ सुंदर ट्रॉफी

Bigg Boss Marathi 5 च्या विजेत्याला मिळणारी झगमगती ट्रॉफी पाहिलात का?

( सविस्तर वृत्त वाचा )

15:13 (IST) 6 Oct 2024
यंदा Money Bag उचलून कोण घराबाहेर पडणार? सोशल मीडियावर ‘या’ सदस्याच्या नावाची चर्चा

दरवर्षी अंतिम फेरीत Money Bag उचलून एका सदस्याला घराबाहेर पडण्याची संधी मिळते. या टास्कमध्ये स्पर्धकांना जास्तीत जास्त रक्कम जिंकण्याची संधी असते. यंदा ही Money Bag उचलून चौथ्या क्रमांकावर जान्हवीने या स्पर्धेतून माघार घेतल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

पाहा पोस्ट

15:07 (IST) 6 Oct 2024
Bigg Boss Marathi – Grand Finale ची पहिली झलक! सूरज-अभिजीतचा भन्नाट डान्स

Grand Finale ची पहिली झलक! सूरज अन् अभिजीतचा ‘झापुक झुपूक’ म्हणत जबरदस्त डान्स

( सविस्तर वृत्त वाचा )

पाहा व्हिडीओ

14:42 (IST) 6 Oct 2024
Bigg Boss Marathi Grand Finale कुठे पाहता येणार?

Bigg Boss Marathi 5 : उरले फक्त काही तास! ग्रँड फिनाले विनामूल्य कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या

( सविस्तर वृत्त वाचा )

14:37 (IST) 6 Oct 2024
Bigg Boss Bhaucha Dhakka – रितेश देशमुखचं भाऊच्या धक्क्यावर कमबॅक, व्हिडीओ व्हायरल

दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर रितेश देशमुख पुन्हा भाऊच्या धक्क्यावर ग्रँड फिनालेसाठी परतला…; व्हिडीओ व्हायरल

( सविस्तर वृत्त वाचा )

 

बिग बॉस मराठी सीझन ५ ग्रँड फिनाले लाईव्ह अपडेट्स