Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सध्या ग्रँड फिनाले सोहळा जोरदार सुरू आहे. यंदाच्या पर्वाचे टॉप-३ स्पर्धक ‘बिग बॉस’ला मिळाले आहेत. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी आणि सूरज चव्हाण हे टॉप-३ स्पर्धक आहेत. या तीन स्पर्धकातून ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरणार आहे. याआधी चौथ्या स्थानावरून कोल्हापूरचा ढाण्या वाघ म्हणजेच धनंजय पोवारची एक्झिट झाली आहे. पण धनंजय पोवारच्या एक्झिटवर नेटकरी नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
नुकतंच एविक्शन पार पडलं. या एविक्शनसाठी टॉप-४ सदस्यांच्या जवळच्या व्यक्तीला ‘बिग बॉस’ घरात पाठवण्यात आलं होतं. यावेळी अभिजीतची पत्नी, धनंजय पत्नी, सूरजची बहीण आणि निक्की आई ‘बिग बॉस’ घरात गेली. या चार सदस्यांच्या जवळच्या व्यक्तींना समोर ठेवलेलं एनवलप उघडायला लावला. ज्या सदस्याच्या एनवलपमध्ये टॉप-३ असेल तो सदस्य टॉप-३मध्ये असणार होता. सर्वात आधी अभिजीतच्या पत्नीला एनवलप उघडायला लावलं. तेव्हा अभिजीतच्या एनवलपमध्ये टॉप-३ म्हणून लिहिण्यात आलं होतं. त्यानंतर सूरजच्या बहिणीने आणि निक्कीच्या आईने एनवलप उघडलं. यावेळी सूरज आणि निक्कीच्या एनवलपमध्येही टॉप-३ लिहिण्यात आलं होतं. तर धनंजयच्या एनवलप एलिमिनेट लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे डीपी चौथ्या स्थानावरून बाद झाला. यावेळी धनंजयची पत्नी भावुक झाली.
नेटकरी काय म्हणाले?
सध्या धनंजयच्या एक्झिटवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “निक्कीमुळे डीपी दादांवर अन्याय झालाय”, “निक्कीमुळे बिग बॉसने डीपी दादाला बाहेर काढलंय #unfaireviction”, “व्होटिंगनुसार नाही तर बिग बॉसच्या स्क्रिप्टनुसार डीपी दादा तुम्ही बाहेर आला”, अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.
हेही वाचा – “धनंजय अतिशय पोरकटपणे वागत होता”, वर्षा उसगांवकरांना डीपीचं खटकलं वागणं, म्हणाल्या, “अंकिताचा वकील…”
एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “बिग बॉस तुम्ही किती लोकांच्या मताशी खेळता. निक्की बॉटममध्ये होती हे सगळ्यांना माहित आहे. धनंजयला निक्की पेक्षा जास्त व्होट होते.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “शेवटपर्यंत बिग बॉस निक्कीची पायपुसणी राहिलं.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, बिग बॉस चुकीचा निर्णय. चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “डीपी दादा पेक्षा निक्कीला व्होट कमी आहेत तरी सेफ कशी ती?”