Bigg Boss Marathi Season 5 Opening Ceremony Highlights : ‘बिग बॉस मराठी’च्या बहुचर्चित पाचवा सीझनची मोठ्या दणक्यात सुरुवात झालेली आहे. यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुख सांभाळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून यावर्षी स्पर्धक म्हणून घरात कोण प्रवेश करणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आज पार पडणाऱ्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यात याचा उलगडा झाला आहे. यावर्षी स्पर्धकांसाठी ‘बिग बॉस’चं संपूर्ण घर काचेच्या महालासारखं सजवण्यात आलं आहे.

१६ स्पर्धकांचा बिग बॉसच्या घरात प्रवेश

वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे.

Live Updates
23:08 (IST) 28 Jul 2024
'बिग बॉस'च्या घरात एकूण १६ स्पर्धकांची एन्ट्री!

'बिग बॉस'च्या घरात एकूण १६ स्पर्धकांची एन्ट्री! 'या' सोळा जणांमध्ये रंगणार अटीतटीचा सामना...

वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण

आता प्रेक्षकांना रोज रात्री ९ वाजता 'बिग बॉस मराठी' पाहता येणार आहे.

23:04 (IST) 28 Jul 2024
गुलीगत धोका फेम रिल स्टारची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

गुलीगत धोका फेम रिल स्टारची बिग बॉसच्या घरात एन्ट्री... सूरज चव्हाणचा पोहोचला बिग बॉसच्या मंचावर

https://www.instagram.com/p/C9-ZHzgSA-V/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

22:48 (IST) 28 Jul 2024
किर्तनकार पुरूषोत्तमदादा पाटील यांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

महाराष्ट्राचे लाडके किर्तनकार व तरुणांचे गुरु पुरूषोत्तमदादा पाटील यांचा बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश

https://www.instagram.com/p/C9-XQoYNn-I/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

22:43 (IST) 28 Jul 2024
अमरावतीच्या रॅपर गर्लची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

अमरावतीच्या रॅपर गर्लची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री! आर्याचा hustle ठरणार सगळ्यांवर भारी

आर्याने चक्क रितेश देशमुखसाठी खास रॅप लिहून तो मंचावर सादर करून दाखवला.

https://www.instagram.com/reel/C9-VgJ7Nquz/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

22:40 (IST) 28 Jul 2024
बिग बॉस मराठीच्या घरात पोहोचले एकूण १२ स्पर्धक

बिग बॉसच्या घरात आतापर्यंत एकूण १२ स्पर्धकांनी एन्ट्री घेतली आहे.

वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण

22:29 (IST) 28 Jul 2024
SplitsVillaचा स्टार अरबाज पटेल पोहोचला बिग बॉसच्या घरात

बिग बॉस मराठीच्या घरात SplitsVilla चा स्टार अरबाज पटेलची होतेय त्याच्या style आणि swag ने entry!

https://www.instagram.com/p/C9-Viy8NI5Y/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

22:25 (IST) 28 Jul 2024
हिंदी 'बिग बॉस' गाजवणाऱ्या डोंबिवलीच्या धाकड गर्लची घरात एन्ट्री!

हिंदी 'बिग बॉस' गाजवणाऱ्या डोंबिवलीच्या धाकड गर्लची घरात एन्ट्री! सादर केला जबरदस्त परफॉर्मन्स

Bold आणि Beautiful अशी ही डोंबिवलीची धाकड मराठी मुलगी, निक्की तांबोळीची बिग बॉस मराठीमध्ये एन्ट्री

https://www.instagram.com/reel/C9-T8pCtdCg/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

22:16 (IST) 28 Jul 2024
परदेसी गर्ल इरिना रूडाकोवाची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

परदेसी गर्ल इरिना रूडाकोवा करतेय इंटरनॅशनल स्टाईलने कल्ला...बिग बॉसच्या घरात घेतला प्रवेश

https://www.instagram.com/reel/C9-TKWFthbC/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

22:14 (IST) 28 Jul 2024
घनःश्याम दरवडेची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री

नेहमी राजकीय सभा गाजवणारा छोटा पुढारी, घनःश्याम दरवडे येतोय आता गाजवायला 'बिग बॉस मराठी'चा मंच

https://www.instagram.com/p/C9-THdOtMI8/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

22:05 (IST) 28 Jul 2024
मोहब्बतें लुटाऊंगा...; पहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतची 'बिग बॉस मराठी'मध्ये एन्ट्री!

पहिला इंडिया आयडॉल व स्टार मराठी गायक अभिजीत सावंत पोहोचला 'बिग बॉस'च्या घरात...गायक २० वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकण्यासाठी सज्ज!

https://www.instagram.com/reel/C9-Q9Ghtnvk/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

21:52 (IST) 28 Jul 2024
'जीव माझा गुंतला' फेम अभिनेत्री योगिता चव्हाणची बिग बॉसच्या घरात एन्ट्री!

लग्नानंतर पाच महिन्यांनी 'जीव माझा गुंतला' फेम अभिनेत्री योगिता चव्हाणची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री!

https://www.instagram.com/p/C9-Qt4FtGGJ/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

21:48 (IST) 28 Jul 2024
'बिग बॉस'च्या घरात पोहोचले एकूण सहा स्पर्धक!

योगिता चव्हाण व जान्हवी किल्लेकरची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री! एक नायिका, तर दुसरी खलनायिका...

21:33 (IST) 28 Jul 2024
'बिग बॉस मराठी'चा चौथा स्पर्धक आहे पंढरीनाथ कांबळे

'बिग बॉस मराठी'च्या घरात होणार पंढरीनाथ कांबळे यांच्या पंचेसची जादू... BB House मध्ये चौथ्या स्पर्धकाची एन्ट्री!

https://www.instagram.com/reel/C9-NgzRtIpF/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

21:16 (IST) 28 Jul 2024
'बिग बॉस'मध्ये असणार Bigg Boss करन्सी

'बिग बॉस मराठी'च्या घरात यंदा Bigg Boss करन्सी देण्यात येणार आहे. या करन्सीचा वापर करून सहभागी स्पर्धक विविध सुख-सुविधांचा लाभ घेऊ शकतात.

21:12 (IST) 28 Jul 2024
'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या स्पर्धक आहेत वर्षा उसगांवकर!

सुख म्हणजे नक्की काय असतं! मालिका सोडल्यावर वर्षा उसगांवकर पोहोचल्या 'बिग बॉस'च्या घरात...

सुख म्हणजे नक्की काय असतं! ही मालिका सोडल्यावर वर्षा उसगांवकर यांची बिग बॉसमध्ये एन्ट्री...'अप्सरा आली' गाण्यावर सादर केला खास परफॉर्मन्स

https://www.instagram.com/p/C9-MUJuyQBB/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

21:07 (IST) 28 Jul 2024
'बिग बॉस'च्या घरात असणार यंदा 'डिलेमा रुम'!

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाची थीम यंदा चक्रव्हूय अशी असेल. तर स्पर्धकांसाठी खास 'डिलेमा रुम' तयार करण्यात आली आहे.

21:04 (IST) 28 Jul 2024
लय भारी परफॉर्मन्स!

रितेश देशमुखच्या जबरदस्त एन्ट्रीने या पर्वाची सुरुवात झालेली आहे. मंचावर 'लय भारी' परफॉर्मन्स सादर करत अभिनेत्याने या पर्वाबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली आहे.

https://www.instagram.com/reel/C9-KLtotp3t/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

21:00 (IST) 28 Jul 2024
बिग बॉस मराठीच्या ग्रँड प्रीमियरला सुरुवात!

बहुचर्चित बिग बॉस मराठीच्या ग्रँड प्रीमियरला आता सुरुवात झालेली आहे. या सोहळ्यात रितेश देशमुख जबरदस्त एन्ट्री घेत परफॉर्मन्स सादर करणार आहे.

https://www.instagram.com/reel/C97teCfy1Gs/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

20:36 (IST) 28 Jul 2024
'बिग बॉस मराठी'च्या घराचा दरवाजा उघडणार! शेवटचा फक्त अर्धा तास बाकी...

'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला आता काही वेळातच सुरुवात होणार आहे. हा सोहळा सुरु होताच स्पर्धक एक-एक करून घरात एन्ट्री घेणार आहेत.

https://www.instagram.com/p/C9-EOjzNhG3/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

20:31 (IST) 28 Jul 2024
यंदाचा सीझन रितेश देशमुख स्टाइलने गाजणार...

यंदा ढोल ताशाच्या गजरात सगळे स्पर्धक ‘बिग बॉस’च्या चक्रव्यूव्हात शिरणार आहेत. जे चांगले वागणार त्यांची रितेश वाहवाह करणार आहे…पण, जे वाईट वागणार त्यांना अभिनेता कसा धडा शिकवणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. एकंदरीत काय तर सगळ्यांची वाजणार अन् हा सीझन गाजणार…कारण रितेश म्हणतोय, “मी येणार तर कल्ला होणारच”.

https://www.instagram.com/reel/C9Usz-HNITS/?utm_source=ig_web_copy_link

20:26 (IST) 28 Jul 2024
'बिग बॉस मराठी' कुठे व केव्हा पाहता येणार?

प्रेक्षक ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन रोज रात्री ९ वाजता कलर्स मराठी वाहिनीवर किंवा जिओ सिनेमा या ओटीटी अ‍ॅपवर पाहू शकतात. ओटीटीवर हा शो पाहायचा असल्यास प्रेक्षकांना प्रतिमहिना २९ रुपये भरावे लागणार आहेत. २४ तास ड्रामा सुरु असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यावर्षी काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

20:24 (IST) 28 Jul 2024
‘बिग बॉस मराठी’चं यंदाचं पर्व होस्ट करणार रितेश देशमुख!

'बिग बॉस मराठी'च्या यापूर्वीच्या चार पर्वांचं होस्टिंग ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी केलं होतं. परंतु, यंदा ही जबाबदारी तमाम महाराष्ट्राला ‘वेड’ लावणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्यावर म्हणजेच रितेश देशमुखवर सोपवण्यात आली आहे.

20:10 (IST) 28 Jul 2024
'बिग बॉस मराठी'च्या ५व्या सीझनचं घर आतून कसं आहे?

‘Bigg Boss Marathi’च्या घरात एन्ट्रीलाच भव्य प्रवेशद्वार आहे. यानंतर आपण लिव्हिंग एरियामध्ये पोहोचतो. प्रशस्त अशा हॉलमध्ये स्पर्धकांना आरामदायी अशा आधुनिक फर्निचरची निर्मिती करण्यात आली आहे. यंदा कॅप्टन रुम व बेडरुमला निळ्या व जांभळ्या रंगाच्या थीममध्ये सजवण्यात आलं आहे. कॅप्टन रुमला अतिशय ड्रिमी लूक देण्यात आला आहे.

https://www.instagram.com/reel/C98xfOuoYtm/?utm_source=ig_web_copy_link

bigg boss marathi season 5

'बिग बॉस मराठी' सीझन ५ हायलाईट्स

Story img Loader