Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा पहिला भाऊचा धक्का ( वीकेंड का वार ) नुकताच पार पडला. गेल्या आठवड्यात एकूण सहा सदस्य नॉमिनेट होते. वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, योगिता चव्हाण, सूरज चव्हाण, पुरुषोत्तमदादा पाटील यांचा यात समावेश होता. यापैकी प्रेक्षकांना दिलेल्या मतांनुसार पुरुषोत्तमदादा पाटील यांनी घराचा निरोप घेतला. आता ‘बिग बॉस’च्या घरात दुसऱ्या आठवड्यात काय होणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘बिग बॉस मराठी’चा दुसऱ्या आठवड्याचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये जान्हवी व सूरजमध्ये जोरदार भांडण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. किचन परिसरात या दोघांमध्ये वाद होत असल्याचं नव्या प्रोमोमध्ये दिसत आहे. दोघांना घरातील इतर सदस्य शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात लागलाय तडका, जान्हवी आणि सूरजचा ‘गुलीगत झगडा’ असं कॅप्शन देत ‘कलर्स मराठी’ वाहिनीने हा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance Video
‘झुमका गिरा रे…’, ५९ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर Bigg Boss फेम योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स! पतीची खास कमेंट
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Sarangi Mahajan Serious Allegations on Dhananjay and Pankaja Munde
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप, “धनंजय आणि पंकजाने माझी साडेतीन कोटींची जमीन हडप केली, वाल्मिक कराड…”
Bigg Boss 18 Vivian Dsena Is Upset With salman khan and Kamya Panjabi
Bigg Boss 18: “…तर माझ्याजागी दुसऱ्याला बोलवा”, सलमान खान-काम्या पंजाबीने सुनावल्यानंतर विवियन डिसेना नाराज; म्हणाला, “तेव्हा मी बंडखोर..”
Bigg Boss 18 kashish Kapoor slam on Shilpa Shirodkar
Bigg Boss 18: “हीच तोंडपण बघायचं नाही…”, घराबाहेर येताच कशिश कपूरची शिल्पा शिरोडकरवर टीका, म्हणाली…
Sujay Vikhe Patil On Shirdi Sai Sansthan
Sujay Vikhe : ‘महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झालेत, शिर्डीतील मोफत जेवण बंद करा’, सुजय विखेंचं विधान चर्चेत
Bigg Boss 18 salman khan kamya Punjabi slams on Vivian dsena watch promo
Bigg Boss 18: “फक्त लूक आणि आवाजावर…”, सलमान खान-काम्या पंजाबीने विवियन डिसेनाची केली कानउघडणी, काय म्हणाले? जाणून घ्या…
Bigg Boss 18 salman khan slams chahat pandey on weekend ka vaar
Bigg Boss 18: अविनाश मिश्राला ‘स्त्रीलंपट’ म्हणण्यावरून सलमान खान भडकला, चाहत पांडेचा ‘तो’ फोटो दाखवत केली पोलखोल

हेही वाचा : Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकरांनी ‘मूर्ख मित्रा’चं लॉकेट दिलं ‘या’ स्पर्धकाला, म्हणाल्या, ‘माझं खच्चीकरण…”

जान्हवी या प्रोमोमध्ये म्हणते, “किती फाल्तू आहे रे हा…” यावर सूरज तिला सांगतो, “चल निघ…” हे ऐकताच जान्हवी “माझ्यासमोर शहाणपणा करायचा नाही” असं सूरजला सांगते. यानंतर दोघांमध्ये चांगलंच वाजतं आणि शेवटी जान्हवी “तुला कसं बाहेर काढायचं हे आम्ही बघू” असं सूरजला सांगते.

जान्हवीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

नेटकऱ्यांनी हा प्रोमो पाहून जान्हवीला चांगलंच ट्रोल केलं आहे. “निक्कीच्या आधी या जान्हवीला घराबाहेर काढा”, “कर त्याला nominate बाहेर जनता आहे सर्वात आधी तोच safe होईल”, “फाल्तू तर तू आहेस नुसती वच वच करते”, “जान्हवी तू या घरात सर्वात मोठी व्हिलन आहेस”, “ही सर्वांनाच काढायला बसली… हिला सगळ्यांनी मिळून काढा एकदा बाहेर” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या प्रोमोवर दिल्या आहेत.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “हिची लायकी नाही”, निक्की तांबोळीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून पुन्हा भडकले प्रेक्षक, म्हणाले, “मुर्ख आहे…

Jahnavi Killekar
जान्हवी किल्लेकर ( Jahnavi Killekar )
Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

दरम्यान, Bigg Boss मराठी हा शो दररोज रात्री ९ वाजता प्रेक्षकांना कलर्स मराठी’ वाहिनी आणि जिओ सिनेमावर पाहता येणार आहे. आता येत्या आठवड्यात घरातून बाहेर होण्याच्या प्रक्रियेत कोण नॉमिनेट होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Story img Loader