Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहाव्या आठवड्याचा नवीन कॅप्टन सूरज चव्हाण झाला आहे. कॅप्टनपद मिळाल्याने आता पुढच्या आठवड्यात सूरज सेफ असेल. याशिवाय घराचा संपूर्ण कारभार या आठवड्यात त्याला सांभाळायचा आहे. अंकिता वालावलकर, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर यांच्यानंतर पाचवा कॅप्टन होण्याचा बहुमान सूरजला मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सूरज चव्हाण कॅप्टन झाल्यावर घरात सगळ्यांनीच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. निक्कीने तर त्याला मिठी मारली. याशिवाय सगळ्या सदस्यांनी एकत्र मिळून सूरजच्या स्टाइलने ‘झापुक झुपूक’ म्हणत डान्स केला. “हमारा नेता कैसा हो… सूरज जैसा हो” अशी घोषणाबाजी देखील घरात करण्यात आली. घरातलं वातावरण आनंदी असताना जान्हवीला मात्र सूरजचं कॅप्टन होणं अजिबात आवडलेलं नाही. घरातल्या अन्य सदस्यांनी कॅप्टन होण्यासाठी सूरजला पाठिंबा दिल्यामुळे जान्हवी प्रत्येकाला जाब विचारणार आहे. आजच्या भागात नेमकं काय घडणार याचा प्रोमो ‘कलर्स मराठी’ वाहिनीने शेअर केला आहे.

हेही वाचा : भूषण प्रधानने घेतलं नवीन घर! गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आई-बाबांना दिली खास भेट; म्हणाला, “गेल्या ६ महिन्यांपासून…”

Bigg Boss Marathi : जान्हवीने विचारला जाब

‘BB कॅप्टन्सीची बस’ या कार्यातून अंकिता, वर्षा, जान्हवी आणि सूरज या चार सदस्यांची कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी निवड करण्यात आली. यातून एकाला कॅप्टन होण्याचा बहुमान मिळणार होता. घरातल्या अन्य सदस्यांनी सूरजला पाठिंबा दिल्यामुळे जान्हवी रागात म्हणते, “हा का कॅपेबल आहे कॅप्टन्सीसाठी मला आता सांगा…तुम्हाला मनापासून वाटतं का मी कॅप्टन होण्याच्या लायकीची नाहीये?”

“जे लोक सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना तुम्ही म्हणत आहात की, तुम्ही सुधारलात तरी काही फायदा नाहीये. आम्ही तुमच्याशी तसंच वागणार…दुसरी अपेक्षाच काय करू शकते मी…” असं म्हणत जान्हवीला अश्रू अनावर झाल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video : आधी ‘हिरवा निसर्ग’ आता ‘सुपारी फुटली’! ‘नवरा माझा नवसाचा २’ मध्ये आहे सोनू निगमचं खास गाणं, व्हिडीओ आला समोर

Bigg Boss Marathi : नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, सूरजला ( Bigg Boss Marathi ) प्रेक्षकांकडून मोठा पाठिंबा असल्याने जान्हवीवर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. “सूरजलाच विरोध करा कॅप्टन बनवताना काय राव तुम्ही”, “Captaincy साठी हुशारी बरोबर, आधी स्वतःवर कंट्रोल असायला हवा जो जान्हवीचा स्वतःवर नाहीये”, “४ दिवस चांगलं वागणं आणि कायम चांगलं वागण्यात खूप फरक असतो बाई” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या प्रोमोवर केल्या आहेत. परंतु, जान्हवीच्या काही चाहत्यांनी तिची बाजू देखील घेतली आहे.