Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सहावा आठवडा संपला आहे. शनिवारी ( ७ सप्टेंबर ) झालेल्या भाऊच्या धक्क्यावर एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे रितेश देशमुखने जान्हवी किल्लेकरला धक्क्यावर बसण्याची परवानगी दिली. वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे यांचा अपमान आणि एकंदरीत घरातील वागणुकीमुळे जान्हवीला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. तसंच तिला भाऊच्या धक्क्यावर बसण्यास मनाई केली होती. पण या शिक्षेनंतर जान्हवीमध्ये झालेल्या सुधारणा पाहून शनिवारी रितेशने तिला भाऊच्या धक्क्यावर बसायला सांगितलं.

नुकताच ‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडिया पेजवर ‘बिग बॉस मराठी’चा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमधून जान्हवीमुळे एका चाहत्याचं नुकसान झालेलं समोर आलं आहे. हा प्रोमो सध्या चांगलाच व्हायरल होतं आहे.

हेही वाचा – दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग झाले आई-बाबा, अभिनेत्रीने दिला गोंडस मुलीला जन्म

नक्की काय घडलं?

‘बिग बॉस मराठी’च्या या प्रोमोमध्ये जान्हवी चाहत्याची कमेंट वाचताना दिसत आहे. या कमेंटमध्ये चाहत्याने लिहिलं आहे की, जान्हवी, बाहेर आल्या आल्या मला तुमचा नंबर द्या… कारण तुमच्यामुळे माझं ३५६८ रुपयाचं नुकसान झालं आहे… मी नवीन काचेचा डिनर सेट घेतला होता.. तो बायको हातात घेऊन उभी होती.. आणि त्याच वेळी तुम्ही घनःश्याम वर ओरडलात..आणि दचकून तिच्या हातातून तो पडला, फुटला.. या सगळ्याला जबाबदार तुम्ही आहात… तेव्हा प्लीज प्लीज प्लीज.. माझे ३५६८ रुपये देऊन टाका.

हेही वाचा – Video: रश्मी ठाकरेंनी अँटिलियाच्या राजाचं घेतलं दर्शन, सिल्कच्या साडीतील लूकने सर्वांचं वेधलं लक्ष

हे वाचल्यानंतर जान्हवीसह घरातील स्पर्धक हसू लागले. रितेश म्हणाला, “तुम्ही तयारी केली आहे का?” जान्हवी म्हणाली, “हो सर, मी नक्की देईन.” त्यावर रितेश म्हणाला, “तुम्ही केवढं घाबरलात की पुढे काय असणार आहे?” तेव्हा जान्हवी म्हणाली, “हो सर.” त्यानंतर रितेश म्हणाला की, ठीक आहे. तुमचं थोडंफार नुकसान झालंच.

हेही वाचा – Video: “मधेमधे तिच्या तोंडून…”, पंढरीनाथ कांबळेने निक्कीला भरवला कडू लाडू, कारण देत म्हणाला…

जान्हवीच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच अभिनेता पुष्कर जोगने देखील हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. दरम्यान, आज ‘बिग बॉस मराठी’च्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. आता हा नवा स्पर्धक कोण असणार? आणि काय राडा करणार? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.