Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. ६ ऑक्टोबरला मोठ्या थाटामाटात हा ग्रँड फिनाले झाला आणि या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला. तर उपविजेता अभिजीत सावंत झाला. ७० दिवसांचा हा प्रवास अखेर रविवारी संपला. सध्या टॉप-६मधील सदस्यांचं घरी जंगी स्वागत होताना पाहायला मिळत आहे. जान्हवी किल्लेकरचं कुटुंबियांनी घरी जल्लोषात स्वागत केलं. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून तिच्या निर्णयाचं कौतुक होतं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जान्हवी किल्लेकर ही सहाव्या स्थानावरून ‘बिग बॉस’च्या घराबाहेर झाली. टॉप-६ स्पर्धकांना सात लाखांची रक्कम घेऊन खेळ सोडण्याची संधी देण्यात आली होती. पण यावेळी कुठल्याही सदस्याने खेळ सोडणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं. त्यानंतर रक्कमेत दोन लाखांची वाढ केली. त्यामुळे रक्कम एकूण नऊ लाख झाली. यावेळी मात्र जान्हवीने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जान्हवीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. कारण तिने खेळ सोडला नसता तर ती कमी मतांमुळे एलिमिनेट झाली असते. त्यामुळे तिला जे नऊ लाख मिळाले ते पण मिळाले नसते. म्हणून जान्हवीच्या निर्णयाचं कौतुक होतं आहे.

हेही वाचा – Bigg Boss Marathi : “डीपी दादांवर अन्याय…”, धनंजय पोवारच्या एक्झिटवर नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले, “चुकीचा निर्णय”

जान्हवीने ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये जान्हवीचं कुटुंबायांनी वाजगाजत घरी स्वागत केल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी जान्हवीच्या नवऱ्यासह तिचा मुलगा, मित्र-मैत्रीणी सर्व जण जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. याच व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत जान्हवीवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

नेटकरी काय म्हणाले?

“नऊ लाखांची मालकीन योग्य निर्णय घेतला”, “जान्हवी भारी खेळली”, “तू काय गेम केला…तुला मानलं”, “खरंच जान्हवी तू खरी खेळाडू निघाली”, “जान्हवी शेवटच्या टप्प्यात खूप छान खेळली”, “अंतिम क्षणी घेतलेला निर्णय एकदम शार्प माइंड होता”, “एक नंबर निर्णय…जान्हवीला नऊ लाखाची लॉटरी लागली”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 18 Grand Premiere : गुणरत्न सदावर्तेंसह ‘या’ स्पर्धकांची ‘बिग बॉस १८’च्या पर्वात दमदार एन्ट्री, सोबतीला असणार गाढव

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या स्पर्धेतून जान्हवी बाहेर पडल्यानंतर अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, निक्की तांबोळी हे घराबाहेर झाले. अखेर अभिजीत आणि सूरज टॉप-२मध्ये आले. सर्वाधिक मतांमुळे सूरज ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 janhvi killekar warm welcome at home praise from netizens pps