Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकताच अंतिम कॅप्टन्सीचा टास्क पार पडला. अरबाज, धनंजय, सूरज आणि वर्षा उसगांवकर या कॅप्टन्सीच्या उमेदवार होत्या. ‘कोणाचं गोड पाणी कोणाची तहान भागवणार?’ हा अंतिम कॅप्टन्सी टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये कॅप्टन्सीच्या उमेदवारांसह इतर चार सदस्यांनी सहभाग घेतला होता. अभिजीत आणि संग्राम यांना दुखापत झाल्यामुळे त्यांना हा टास्क खेळता आला नाही. पण अभिजीत आणि संग्राम या टास्कने संचालक होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कोणाचं गोड पाणी कोणाची तहान भागवणार?’ या टास्कमध्ये पक्षी असलेल्या सदस्यांनी (निक्की, जान्हवी, पंढरीनाथ, अंकिता) आधी बझर वाजवून कॅप्टन्सी उमेदवाराच्या एका ग्लासाची किंमत ठरवायची होती. अंतिम फेरीत ज्या उमेदवाराकडे जास्त बीबी करन्सी असेल त्याला विजयी घोषित करणार. या टास्कच्या दोन्ही फेरीत निक्कीने बझर वाजवून चांगलीच बाजी मारली.

हेही वाचा – Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीला मिळाली सव्वा लाखाची पैठणी, अनुभव सांगत म्हणाली, “आदेश भाऊजींच्या…”

दोन्ही फेरीत तिने अरबाजच्या एका ग्लासाची किंमत सर्वाधिक ठरवली. त्यामुळे धनंजय, सूरज हे दोघं पहिल्या, दुसऱ्या फेरीत बाद झाले. त्यानंतर वर्षा आणि अरबाजमध्ये अंतिम फेरी होती. पण अंतिम फेरीत पंढरीनाथ आणि अंकिताने बझर दाबण्याचे कष्टही घेतले नाहीत. कारण टास्क आधी वर्षा उसगांवकर अरबाज, निक्कीच्या टीमबरोबर स्ट्रॅटजी करताना दिसल्या होत्या. त्यामुळे पंढरीनाथ आणि अंकिताने वर्षा ताईंसाठी खेळायचं नाही, असं ठरवलं. अखेर अरबाज आठव्या आठवड्याचा कॅप्टन झाला. याच कॅप्टन्सी टास्कवरून अभिनेता कपिल होनरावने अरबाजचं कौतुक करत पंढरीनाथ, अंकिता आणि डीपीला सवाल केला आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला कपिल होनराव नेहमी ‘बिग बॉस मराठी’विषयी बोलत असतो. बऱ्याचदा तो वर्षा उसगांवकरांना पाठिंबा देताना दिसला आहे. नुकत्याच झालेल्या कॅप्टन्सी टास्क पाहून कपिल म्हणाला, “अरबाज प्रचंड हुशारीने गेम खेळतोय…शरीर आणि डोक्याचा वापर करून…समोरच्याला घोळात कसं घ्यायचं त्याला बरोबर माहित आहे…अख्खा शो निक्की आणि अरबाजच्या मागे-पुढे चालतो…पंढरीनाथ कांबळे, अंकिता आणि डीपी…मुळात ते भरकटलेत…असा गेम खेळून कसं पुढे जाणार?…ताईला कॅप्टन करून गेम पालटवला पाहिजे होता.’

हेही वाचा – Video: “जाहीर झालं जगाला…”, ‘येक नंबर’ चित्रपटातील अजय गोगावले आणि श्रेया घोषालच्या आवाजातील प्रेमगीत प्रदर्शित, पाहा…

Kapil Honrao Post

‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट

दरम्यान, या आठवड्यात अरबाज, निक्की, जान्हवी, सूरज आणि वर्षा उसगांवकर हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता आठव्या आठवड्यात कोण घराबाहेर होतंय? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 kapil honrao appreciated to arbaz and question to pandharinath and ankita pps