Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सध्या चांगलं गाजत आहे. या पर्वातील स्पर्धकांनी पहिल्या दिवसांपासून एकप्रकारे वेगळा धिंगाणा घातला आहे. दर आठवड्याला काही स्पर्धक वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. त्यामुळे या स्पर्धकांना जबरदस्त ट्रोल केलं जात आहे. अलीकडेच जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा अभिनयावरून अपमान केल्यामुळे मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली. अनेक कलाकारांनी जान्हवीला खडेबोल सुनावलं. पण या सगळ्या वादापासून दूर असलेला सुरज चव्हाणला महाराष्ट्राकडून भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे.

गरीब घरातून आलेल्या रीलस्टार गुलीगत म्हणजे सुरज चव्हाणने आपल्या साधेपणाने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. मराठी कलाकार सुरजला पाठिंबा देत आहेत. ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सुरजने जिंकलं पाहिजे, असं कलाकारांचं म्हणण आहे. पण अशातच एका मराठी अभिनेत्याने सुरज चव्हाणसंदर्भात एक असं वक्तव्य केलं आहे; जे चर्चेत आलं आहे.

हेही वाचा – Video: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा बहिणींबरोबर दाक्षिणात्य लोकगीतावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतो व्हायरल

Suraj Chavan
सूरज चव्हाण (फोटो सौजन्य: कलर्स मराठी)

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला मल्हार म्हणजेच अभिनेता कपिला होनरावने सूरजविषयी वक्तव्य केलं आहे. ‘मराठी मनोरंजन विश्व’ या युट्यूब चॅनलशी संवाद साधताना कपिलला बी टीमबद्दल विचारलं. तेव्हा बी टीमचं कौतुक करत असताना त्याने सुरजचं देखील विशेष कौतुक केलं.

कपिल म्हणाला, “सुरज चव्हाण आपला माणूस आहे. तो पोरगा भारीच आहे. कमाल आहे. मला त्या पोराच्या बाबतीत खूप सहानुभुती आहे. पण मला असं वाटतं की, त्याने अजून स्वतःच्या खेळाच्या बाबतीत बरीच सुधारणा केली पाहिजे. सहानुभूतीच्या जीवावर शो नाही जिंकला पाहिजे. जर तो फक्त सहानुभूतीच्या आधारावर जिंकला तर जे खेळतात ना त्यांचं नुकसान आहे. बाकी काही नाही. सुरजने अजूनही स्वतःची ताकद न घाबरता लावली तर तो जिंकू शकतो. कारण त्याच्याबाबतीत एवढी सहानुभूती आहे.”

हेही वाचा – Video: ‘पारू’ मालिकेत नात्यांचा नवा अध्याय सुरू होणार, प्रितमची प्रेयसी प्रियाचं सत्य समोर येणार

“तो घरातली काम खूप चांगली करतो, ऐकतो. मला तो जास्त कधी आवडला, जेव्हा निक्की त्याला काम लावत होती. माझ्या मेकअपचं सामान घेऊन चल आणि ज्यावेळेस तो बोलला तुझं तू घेऊन जा. ती म्हणाली, मला खाली बसता येत नाहीये. तो म्हणाला, ड्रेस थोडासा मोठा घालं मग. तेव्हा तो मला प्रचंड आवडला. त्या टास्कमध्ये अरबाजबरोबर त्याने जी काही टक्कर घेतली होती, ती कमाल होती. अख्ख्या महाराष्ट्रासाठी तो हिरोच ठरला आहे. पण अजून त्याने चांगलं केलं पाहिजे. कारण तोही शो जिंकू शकतो,” असं कपिल होनराव म्हणाला.

Story img Loader