Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सुरू होताच जोरदार चर्चेत आलं आहे. पहिल्याच दिवसापासून स्पर्धक रणनीतीने खेळताना दिसत आहेत. यादरम्यान कोणत्या ना कोणत्या कारणावरून स्पर्धकांमध्ये वाद होत आहेत. पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर याच्यामध्ये वाद रंगला आहे. सतत निक्की वर्षा उसगांवकरांबरोबर भांडताना दिसत आहे. एवढंच नव्हे तर तिने अनेकदा वर्षा उसगांवकरांचा अपमान देखील केला आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी निक्की तांबोळी विरोधात सोशल मीडियावर आपली मत व्यक्त मांडली आहेत. तसंच नेटकरी सुद्धा निक्कीने माफी मागावी अशी मागणी करत आहेत. पण अशातच ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीने खोचक पोस्ट शेअर केली आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकलेली ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून मीरा जगन्नाथ आहे. मीरा ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात पाहायला मिळाली होती. तिने देखील ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून राडा करायला सुरुवात केली होती. ‘बिग बॉस मराठी’ ( Bigg Boss Marathi ) तिसऱ्या पर्वात मीरा टॉप-६पर्यंत पोहोचू शकली होती. याच मीराने आता सध्या सुरू असलेल्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील वादावरून एक खोचक पोस्ट केली आहे.

हेही वाचा – Bigg Boss Marathi: ‘डबल ढोलकी’ म्हणणाऱ्या सदस्यांना अभिजीत सावंतचं गाण्यातून उत्तर, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री मीरा जगन्नाथने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा ( Bigg Boss Marathi ) फोटो शेअर करत लिहिलं आहे, “इथे कोणीही मान अपमानाची अपेक्षा ठेवू नये. ‘बिग बॉस’च्या घरात कोणी ही मोठा कलाकार किंवा छोटा कलाकार नसतो आणि तुमचं वय घरी ठेवून या. हे माझं मत आहे, ज्याला पटत नसेल त्यांनी मला डीएम करू नये.” मीराच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Bigg Boss Marathi

हेही वाचा – Video: “देखो वो आ गया…”, अमेरिकेहून परतलेल्या संकर्षण कऱ्हाडेला पाहून अमृता खानविलकरची ‘अशी’ होती रिअ‍ॅक्शन, म्हणाली…

रितेश देशमुख उतरवणार निक्की तांबोळीचा माज

दरम्यान, नुकताच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील ( Bigg Boss Marathi ) ‘भाऊच्या धक्क्या’चा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये रितेश देशमुख निक्की तांबोळीवर संतापलेला पाहायला मिळत आहे. “वर्षां ताईंबरोबर ज्या भाषेत तुम्ही बोलता ती भाषा मी खपवून घेणार नाही…त्यांचं कतृत्व, काम याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे. तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला आहे. कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन त्या मराठी माणसाचा अपमान केलाय. आताच्या आता माफी मागा,” असं खडेबोल सुनावतं रितेश निक्कीचा माज उतरवताना दिसत आहे.

Story img Loader