Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील स्पर्धक निक्की तांबोळी सध्या खूप चर्चेत आहे. कारण आहे वर्षा उसगांवकर यांच्याबरोबरचं वागणं. पहिल्या दिवसांपासून निक्की वर्षा उसगांवकरांबरोबर भांडताना दिसत आहे. एवढंच नाहीतर बऱ्याचदा तिने वर्षा उसगांवकर यांचा अपमान देखील केला आहे. आठवडाभर दोघींमधला वाद थांबायचं काही नावचं घेत नाहीये. यामुळे प्रेक्षक देखील भडकले. अनेकांनी निक्कीला ‘बिग बॉस’च्या घराबाहेर काढण्याची मागणी केली. त्यानंतर शनिवारी रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर निक्की तांबोळीला चांगलंच झापलं.

वर्षा उसगांवकर यांचा सातत्याने अपमान करत असलेल्या निक्कीला रितेशने खडेबोल सुनावलं. “वर्षां ताईंबरोबर ज्या भाषेत तुम्ही बोलता ती भाषा मी खपवून घेणार नाही…त्यांचं कतृत्व, काम याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे. तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला आहे. कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन त्या मराठी माणसाचा अपमान केलाय. आताच्या आता माफी मागा,” असं थेट रितेशने सांगितलं. तरीही “निक्की सुधारणार नाही”, असं प्रेक्षक ‘बिग बॉस मराठी’चा ( Bigg Boss Marathi ) नवा प्रोमो पाहून म्हणत आहेत.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…

हेही वाचा – Video: ऐश्वर्या व अविनाश नारकरांनी फ्रेंडशिप डेच्या अनोख्या अंदाजात दिल्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ

‘कलर्स मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर निक्की तांबोळीचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये, निक्कीला एक पाकिट उचलून त्यामधील फोटो एका स्पर्धकाला डेडिकेट करायला सांगितला. त्याप्रमाणे निक्की पाकिट उघडते आणि तिला गुडघ्यात मेंदू असा फोटो येतो. त्यानंतर रितेश म्हणतो, “तुमच्यामते कोणाच्या गुडघ्यात मेंदू आहे. निक्की स्वतःला देऊ नका.” रितेशच्या या मिश्किल वक्तव्यानंतर घरातले स्पर्धक हसतात. त्यावर निक्की म्हणते, “स्वतःला देणार नाही. मला एका व्यक्तीला द्यायचं आहे. पण परत सगळे म्हणतील की, अपमान करते. त्यामुळे मला असं कोणाला द्यायचं नाहीये.” यावर रितेश म्हणतो, “अपमान वगैरे काही नाही. खुलेआम खेळ खेळा.” त्यानंतर निक्की म्हणते, “मला असं वाटतं, वर्षा ताई. कारण की, कधी कधी मॅम एखादा विषय जास्त ताणून धरतात. त्यामुळे त्यांचा गुडघ्यात मेंदू आहे, असं वाटतं.”

नेटकरी काय म्हणाले? वाचा…

निक्की तांबोळीचा हाच प्रोमो पाहून पुन्हा एकदा प्रेक्षक भडकले आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “बाळा निक्की तुला वर्षाताईंचे चाहते बाहेर बांबू घेऊन शोधत आहेत. काळजी घे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “एकतर तुझी लायकी नसताना मराठी बिग बॉसमध्ये आली. वर्षाताईंबरोबर उभं राहायची तुझी लायकी नाही. त्यांना म्हणते गुडघ्यात मेंदू. कोणी हिला ओळखत नाही. बाहेर काढा.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “त्यांचा मेंदू कुठे आहे ते कळेल. एकदा मराठी सिनेसृष्टीचा इतिहास बघ.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “बाई…ही कधी सुधारणार नाही. बिग बॉस मराठीच्या ( Bigg Boss Marathi ) घरात राहण्याची हिची लायकी नाही.” पाचव्या नेटकऱ्याने लिहिलं, “ही मुर्ख आहे. सर्वात मोठी स्पर्धक वर्षा उसगांवकर असल्यामुळे त्यांच्यामागे हात धुवून लागली आहे.”

Bigg Boss Marathi

हेही वाचा – Video: धनंजय पोवारचा इरिनाबरोबर ‘भूतानी पछाडलं’ गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स, नेटकरी म्हणाले, “कल्याणी वहिनी दादाकडे लक्ष द्या…”

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) पाचव्या पर्वातील पहिल्याच आठवड्यात सहा स्पर्धक घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते. यामध्ये वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, धनंजय पोवार, अंकिता प्रभू वालावकर, पुरुषोत्तमदादा पाटील आणि सूरज चव्हाण या सहा जणांचं नाव सामिल आहे. पण शनिवारी दोन स्पर्धक वर्षा उसगांवकर आणि सूरज चव्हाण घराबाहेर होण्यापासून वाचले. आता योगिता चव्हाण, अंकिता प्रभू वालावकर, पुरुषोत्तमदादा पाटील आणि धनंजय पोवार यातून कोण पहिल्याच आठवड्यात बेघर होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader