Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात रविवारी पहिलं एविक्शन पार पडलं. गेल्या आठवड्यात वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, योगिता चव्हाण आणि पुरुषोत्तमदादा पाटील हे सहा सदस्य घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते. अखेर प्रेक्षकांनी दिलेल्या मतांच्या आधारावर पुरुषोत्तम यांना घराचा निरोप घ्यावा लागला. “राम कृष्ण हरी” म्हणत त्यांनी या पर्वाचा निरोप घेतला.

‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घेताना पुरुषोत्तमदादा पाटील यांनी माऊलींची प्रार्थना करत छत्रपती शिवाज महाराज यांच्या नावाचा जयजयकार केला. यावेळी सगळे सदस्य हात जोडून उभे होते. यावेळी पुरुषोत्तम यांनी बाहेर जाऊन “मी सगळ्यांसाठी माऊलींकडे प्रार्थना करेन” असं सांगितलं. यावेळी छोटा पुढारी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. घराचा निरोप पुरुषोत्तम यांनी जयजयकार करून घेतल्याने सध्या सर्वत्र त्यांचं कौतुक करण्यात येत आहे. परंतु, या सगळ्यात प्रेक्षकांना अरबाजबद्दल एक मोठी गोष्ट खटकली आहे.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Shivraj Singh Chouhan statement regarding the indecent behavior of Congress members
संसदेत काँग्रेसची गुंडगिरी : भाजप
What Sharad Pawar Said About Chhagan Bhujbal ?
Sharad Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना…”
MVA Andolan
MVA Agitation : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हाती घेत मविआचं आंदोलन; जयंत पाटील म्हणाले,”षडयंत्र…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi: पहिल्याच आठवड्यात ‘हा’ स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर, छोटा पुढारी झाला भावुक

‘बिग बॉस’च्या घरातील सदस्य अरबाज पटेल हा, पुरुषोत्तमदादा पाटील महाराजांचा जयजयकार करत असताना काहीही न बोलता हाताची घडी घालून उभा असल्याचं पाहायला मिळालं. याबद्दल प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘कलर्स मराठी’ने ‘बिग बॉस’ संदर्भात शेअर केलेल्या सगळ्याच पोस्टवर अरबाजच्या या कृतीबद्दल प्रेक्षकांनी कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली आहे. तर, काही युजर्सनी अरबाजला या घराच्या बाहेर काढा अशी मागणी देखील केली आहे.

अरबाजवर नेटकऱ्यांची नाराजी

पुरुषोत्तमदादा पाटील एविक्ट झाल्याची पोस्ट ‘कलर्स मराठी वाहिनी’ने शेअर केली आहे. यावर एक नेटकरी म्हणतो, “कलर्स मराठीला एक आवर्जून सांगायचंय…जेव्हा दादा बाहेर जाताना जय हरी विठ्ठल म्हणाले, तेव्हा सगळे त्यांच्याबरोबर जयजयकार करत होते… अगदी इरिना सुद्धा बोलत होती. पण, अरबाज मात्र हाताची घडी घालून गप्प उभा होता. अशा वृत्तीच्या लोकांना काय बोलावं? हात जोडले असते ना… सगळ्या महाराष्ट्राचे मन जिंकले असते पण, आता त्याला मत देण्यासाठी मला नाही वाटत कुणाचे हात धजावतील”, दुसरा युजर कमेंट करत म्हणतो, “माऊली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणाले, तेव्हा हा अरबाज गप्प उभा होता, तरी हा Big Boss मराठी मध्ये कसा?” आणखी काही युजर्सनी “अरबाजच्या तोंडून एकपण शब्द बाहेर नाही पडला जेव्हा माऊली संतांचा जयजयकार करत होते तेव्हा” अशा कमेंट्स या पोस्टवर करत घडल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

bb marathi
कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या पोस्टवरील कमेंट्स ( Bigg Boss Marathi )

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “हिची लायकी नाही”, निक्की तांबोळीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून पुन्हा भडकले प्रेक्षक, म्हणाले, “मुर्ख आहे…”

Bigg Boss Marathi
बिग बॉस मराठी ( Bigg Boss Marathi )
बिग बॉस मराठी : व्हिडीओ सौजन्य ( जिओ सिनेमा )

दरम्यान, पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील बेघर झाल्याने काही नेटकऱ्यांनी त्यांना खेळण्याची आणखी संधी मिळाली हवी होती असं देखील म्हटलं आहे. याशिवाय ‘बिग बॉस मराठी’बद्दल सांगायचं झालं तर दररोज रात्री ९ वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण ‘कलर्स मराठी’ वाहिनी व जिओ सिनेमावर करण्यात येतं.

Story img Loader