Bigg Boss Marathi New Season : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व तब्बल २ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अभिनेता रितेश देशमुख यंदा पहिल्यांदा ‘बिग बॉस मराठी’चं होस्टिंग करत आहे. पहिल्याच आठवड्यात नव्या पर्वाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे. या पर्वात बरेच ट्विस्ट असणार आहेत. यापूर्वीच्या चार सीझनमध्ये स्पर्धकांची शाळा चावडीवर घेतली जायची. परंतु, यावर्षी रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर स्पर्धकांची शाळा घेणार आहे.

रितेश भाऊची हटके स्टाईल आणि १६ सदस्यांचा हटके खेळ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. काहीच तासांत यंदाच्या सीझनचा पहिला ‘भाऊचा धक्का’ पार पडणार आहे. या ‘भाऊच्या धक्क्या’वर सदस्यांची पोलखोल होणार आहे. पण त्याआधीच ‘भाऊचा धक्का’ हे गाणं ‘बिग बॉस’प्रेमींच्या भेटीला आलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकर-निक्की तांबोळीच्या वादावर किशोरी शहाणेंनी मांडलं स्पष्टच मत, कोणाची बाजू घेतली? जाणून घ्या…

‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन पूर्णपणे वेगळा आहे. रितेश देशमुख त्याच्या स्टाइलने कल्ला करत यंदाचा सीझन गाजवताना दिसत आहे. आता आपल्या हक्काच्या भाऊच्या धक्क्यावर आधारलेलं एक नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

“आला रे आला…भाऊचा धक्का”

“लपून सारी, बघून बारी, डोक्यात त्याच्या गेलंया,
साऱ्यांना टाईट, करणार राईट, हिशोब त्यानं केलंया,
हटके स्टाइल, किलर स्माइल, धिंगाना याचा करंल
ठशन देणार, हिशोब घेणार, कल्ला आता होणार
कोणाला सोडणार, कोणाल झोडणार विचार केलाय पक्का
रडंल राणी, पळंल राजा…समोर आलाय एक्का
“आला रे आला…भाऊचा धक्का”

‘बिग बॉसच्या मराठी’च्या नवीन गाण्याचे बोल असे आहेत. रितेश देशमुख कोणाची शाळा घेणार, कोणाचं कौतुक करेल हे आजच्या पहिल्या भाऊच्या धक्क्यावर पाहायला मिळेल. एकंदरीतच भाऊच्या धक्क्यावर तो स्पर्धकांचा हिशोब घेणार आहे. त्यामुळे कल्ला तर होणारच…

हेही वाचा : Bigg Boss Marathi 5 : अंकिता प्रभू वालावलकरला घरातील ‘हे’ काम करायची वाटते भीती; रडत केला खुलासा

bigg boss marathi riteish
रितेश देशमुख

हेही वाचा : “Be Strong माई”, वर्षा उसगांवकरांच्या ऑनस्क्रीन लेकाची पोस्ट चर्चेत! म्हणाला, “रितेश भाऊ बरोबर क्लास…”

‘भाऊचा धक्का’ या गाण्यात रितेश देशमुखचा रुबाब पाहायला मिळत आहे. त्याचा हटके स्वॅग, त्याची स्टाईल आणि उत्साह या गाण्यात परफेक्ट दिसून येत आहे. रितेश देशमुख दर वीकेंडला ‘भाऊच्या धक्क्यावर’ घरातील सदस्यांचा हिशोब पक्का करणार आहे. त्यामुळे हा ‘भाऊचा धक्का’ चांगलाच गाजणार आहे.