Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. यंदा घरात एकूण १६ स्पर्धकांनी प्रवेश घेतला आहे. खेळ सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी घरातील स्पर्धकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. ‘बिग बॉस मराठी’च्या खेळात यंदा अनेक नवनवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी स्पर्धकांसमोर नेमका काय ट्विस्ट आला जाणून घेऊयात…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Bigg Boss Marathi चा नवा सीझन प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवत आहे. पहिल्या दिवशी सदस्यांना पाणी नसणं, नाश्ता न मिळणं अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. अशातच ‘बिग बॉस’ने घरातील सर्व सदस्यांना मिळून ज्यांची निर्णय क्षमता कमी आहे अशा तीन सदस्यांची निवड करण्यास सांगितली. सदस्यांनी सर्वानुमते सूरज चव्हाण, इरिना रूडाकोवा आणि धनंजय पोवार या तीन सदस्यांची नावे घेतली. अर्थात हे तिन्ही सदस्य या निर्णयाबद्दल काहीसे नाराज होते. त्यामुळे ‘बिग बॉस’ने या निर्णयात आणखी ट्विस्ट आणला आहे. याबद्दल जाणून घेऊयात…
हेही वाचा : Bigg Boss Marathi : “तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती”, निक्की वर्षा उसगांवकरांवर भडकली अन्…, पाहा प्रोमो
आजच्या भागात याच तीन सदस्यांना ‘बिग बॉस’ने निर्णय घ्यायला लावला असल्याचं पाहायला मिळणार आहे. सूरज चव्हाणला निर्णय घेण्यात जास्त वेळ लागत असल्याने आजच्या भागात तो म्हणतो,”माझं डोकं पिकायला लागलंय”…या तिघांना योग्य बीबी करन्सी खर्च करून सामान घेता न आल्याने घरातले मात्र चांगलेच वैतागणार आहेत.
इरिना, सूरज आणि धनंजय काय निर्णय घेणार?
इरिना, सूरज आणि धनंजय यांना ‘बिग बॉस’ त्यांच्याकडे असलेल्या बीबी करन्सीमधून घरासाठी लागणाऱ्या गोष्टी आणि राशन विकत घ्यायला सांगतात. दरम्यान डीपी म्हणजेच धनंजय पोवार म्हणतो, “आपल्याला चना डाळ आणि मूग डाळ तरी घ्यावी लागेल”. त्यावर इरिना म्हणते,”सगळचं घ्या… निर्णय घेण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवत आहे”. इरिना आणि धनंजयच्या संभाषणावर सूरज म्हणतो, “आता माझं डोकं पिकायला लागलंय”… तर धनंजय म्हणतो,”माझं फुटलं”. यावर सूरज पुढे म्हणतो,”तुझं फुटलंय माझं तुटेल” या तिघांमधील हा संवाद ऐकून घरातील सदस्य चांगलेच वैतागतात.
हेही वाचा : Video : Bigg Boss वहिनीचं तरी ऐका! घरात वाहू लागले प्रेमाचे वारे; निक्की तांबोळी अन् अरबाजची जोडी जमणार का?
सूरज चव्हाण, इरिना रूडाकोवा आणि धनंजय पोवार घरातील सदस्यांसाठी काय-काय राशन घेणार?, घरातील सदस्यांना लॅव्हिश ब्रेकफास्टची मेजवानी मिळणार का?, डिसिजन मेकर नसलेले सदस्य ‘बिग बॉस मराठी’च्या घरात डिसिजन कसा घेणार? या सर्व गोष्टी जाणून Bigg Boss Marathi च्या आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळतील.