Bigg Boss Marathi Season 5 Updates : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झालेली आहे. यंदा घरात एकूण १६ स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. यापूर्वीच्या सीझनमध्ये प्रत्येक आठवड्याला टास्क खेळल्यावर विजेत्या टीमनुसार घरात धान्यवाटप आणि इतर सुख-सुविधांचा लाभ घेता यायचा. परंतु, यावर्षी ‘बिग बॉस’च्या घरात एक नवीन ट्विस्ट असेल. याचा प्रत्यय ग्रँड प्रीमियर सोहळ्यात आला. आता स्पर्धकांना प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतील. याबाबत जाणून घेऊयात…

‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला सुरुवात होताच रितेश देशमुखने यंदा घरात कोणकोणते ट्विस्ट असतील याची माहिती घरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला दिली. यावर्षी ‘बिग बॉस’च्या घरात प्रत्येक गोष्टीचा वापर करण्यासाठी चक्क पैसे मोजावे लागणार आहेत. ‘बिग बॉस’ करन्सी हा नवीन प्रकार या पर्वात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यावर्षी स्पर्धकांसाठी खास चक्रव्हूयची रचना करण्यात आली आहे. हीच यंदाची थीम असेल.

हेही वाचा : Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’च्या घरात एकूण १६ स्पर्धकांची एन्ट्री! पाहा संपूर्ण यादी, जाणून घ्या नावं

‘बिग बॉस करन्सी’ म्हणजे नेमकं काय?

‘बिग बॉस’च्या घरात प्रत्येक स्पर्धकाला एक विशिष्ट रक्कम देण्यात येणार आहे. या रकमेचा वापर करून संबंधित स्पर्धकांना घरातील सुख-सुविधांचा लाभ घेता येईल. उदाहरणार्थ, शोच्या ग्रँड प्रीमियर भागात ‘बिग बॉस करन्सी’च्या एका नोटेवर ‘१०० Points’ असं लिहिण्यात आल्याचं पाहायला मिळालं. अशाप्रकारे पहिल्या आठवड्यात प्रत्येक स्पर्धकाला प्रत्येकी १० हजार रुपये ( बीबी करन्सी ) ऑफर करण्यात आले होते. १६ पैकी पाच स्पर्धकांनी पैसे न स्वीकारता चैनीच्या वस्तूंना व पॉवर कार्डला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे घरात पहिल्याच दिवशी ट्विस्ट पाहायला मिळतील. अगदी अंघोळीच्या पाण्यापासून ते जेवणापर्यंत प्रत्येक गोष्टीत ही करन्सी महत्त्वाची असेल. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांना प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजेच बेड, बाथरुम, खाण्या-पिण्याच्या सामानासाठी किंमत मोजावी लागणार आहे.

bb currency
बिग बॉस करन्सी ( Bigg Boss Marathi ) फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी

हेही वाचा : Bigg Boss Marathi : प्रतीक्षा संपली! अखेर ‘बिग बॉस’च्या घराची पहिली झलक आली प्रेक्षकांसमोर… पाहा Inside व्हिडीओ

‘बिग बॉस’ Dilemma

‘बिग बॉस’च्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यात स्पर्धकांसाठी डिलेमा ठेवण्यात आला होता. ‘बिग बॉस करन्सी’ की चैनीच्या वस्तू यापैकी एकाची निवड स्पर्धकांना करायची होती. ग्रँड प्रीमियर सोहळ्यात बिग बॉसने एकूण १६ स्पर्धकांना १ लाख ६० हजार रुपये ( बीबी करन्सी ) दिले होते. परंतु, यामधील ५० हजार करन्सी वर्षा, जान्हवी, निकी, वैभव आणि धनंजय या पाच सदस्यांनी डिलेमामध्ये ( आवडत्या गोष्टींसाठी ) गमावली. त्यामुळे या पाच सदस्यांचा निर्णय बरोबर की चुकीचा हे लवकरच कळणार आहे.

bigg boss marathi season 5
Bigg Boss Marathi : पॉवर कार्ड ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी )

हेही वाचा : Bigg Boss Marathi: रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी’ होस्ट करण्यासाठी होकार दिल्यावर ‘अशी’ होती पत्नी जिनिलीयाची प्रतिक्रिया

दरम्यान, वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या १६ स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे.

Story img Loader