Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. कारण, घरातले सगळे सदस्य आता एकमेकांशी वाद घालू लागलेत. गेल्या दोन दिवसांपासून निक्की तांबोळी अन् वर्षा उसगांवकर यांच्यात झालेल्या वादाची चर्चा चालू होती. अशातच आता घरात पहिली नॉमिनेशन प्रक्रिया पार पडणार आहे. या नॉमिनेशन टास्कमध्ये अंकिता अन् निक्कीमध्ये वाद होऊन दोघींनी एकमेकींना धक्काबुक्की केल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
‘बिग बॉस मराठी’ आणि टास्क हे एक समीकरणच आहे. स्पर्धकांना घरात टिकून राहण्यासाठी हुशारीने टास्क खेळावेच लागतात. प्रीमियरपासूनच ‘बिग बॉस’ स्पर्धकांना पेचात पाडत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची सर्वत्र चर्चा होत असून घरातील सदस्यांचं भांडण, राडे, धमाल, मजा-मस्ती ‘बिग बॉस’प्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. ‘बिग बॉस मराठी’ सुरू होऊन चार दिवस पूर्ण झाले असून चौथ्या दिवशीच घरात पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकर अन् निक्कीमध्ये जोरदार भांडण! दोघींनाही अश्रू अनावर, नेमकं काय घडलं?
Bigg Boss च्या घरात निक्की व अंकितामध्ये कडाक्याचं भांडणं
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये आज नॉमिनेशन कार्याचा शुभारंभ होणार आहे. याबाबतचा प्रोमो देखील प्रेक्षकांसमोर आला आहे. ‘नॉमिनेशनची तोफ’ असं या पहिल्या नॉमिनेशन कार्याचं नाव आहे. प्रतिस्पर्ध्याला घराबाहेर काढण्यासाठी ‘बिग बॉस’ने ‘नॉमिनेशन तोफ’ या कार्याचा अवलंब केला आहे. पहिल्याच कार्यादरम्यान ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस’च्या घरात मोठा ट्विस्ट! सदस्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला, पाहा प्रोमो
टास्कसाठी भिडताना अंकिता आणि निक्कीमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाचीदेखील झालेली पाहायला मिळेल. राड्यादरम्यान निक्की अन् अंकिता हा टास्क कसा पूर्ण करणार हे पाहणं मनोरंजक ठरेल. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये पहिल्या आठवड्यात कोणते सदस्य सेफ होणार आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. एक घर, १०० दिवस आणि १६ स्पर्धकांचा प्रवास आता सुरू झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळत आहे.