Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. स्पर्धकांनी हे पर्व चांगलंच गाजवलं आहे. निक्की तांबोळी असो, अभिजीत सावंत असो किंवा सूरज चव्हाण प्रत्येक स्पर्धक आता घराघरात पोहोचले आहेत. काही स्पर्धकांनी आपल्या खेळीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. अशातच निक्की व अरबाजचा एक प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये दोघं वैभवबद्दल बोलताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी ‘भाऊच्या चक्रव्ह्यू’रूम मधून निक्कीला ‘ए’ टीमबद्दलची चुगली दाखवल्यापासून ‘बिग बॉस’च्या घरातील समीकरण बदलली पाहायला मिळाली. एक आठवडा निक्की ‘ए’ टीमविरोधात खेळताना दिसली. एवढंच नव्हे तर अरबाजशी देखील ती बोलत नव्हती. पण आता अरबाज व निक्की पुन्हा एकत्र आले आहेत.

हेही वाचा – Video: “माज जरा कमी कर”, निक्की तांबोळीवर संतापून सोनाली पाटीलने दिला सल्ला, म्हणाली…

‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडियावर नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये अरबाज व निक्की वैभवबद्दल बोलताना दिसत आहेत. निक्की अरबाजला म्हणते, “त्याला ( वैभव ) माझा राग नाही. तो माझ्यावर जळतो आणि तुझ्यावरही जळतो.” अरबाज विचारतो “कोण?” तर निक्की म्हणते, “वैभव”. त्यानंतर अरबाज म्हणतो, “कशावरून वाटतं तो जळतो?” निक्की म्हणते, “बऱ्याच गोष्टी आहेत” मग अरबाज म्हणतो, “एखादी गोष्ट सांग.”

त्यानंतर निक्की अरबाजला समजवतं म्हणते की, सगळ्यात पहिलं म्हणजे तुझं खेळात त्याच्यापेक्षा डोकं जास्त चालतं. तू दिसतो. तुझा राग आहे तो जास्त उभारून दिसतो, असं त्यााला वाटतं. वीकेंडवर मग त्यालाच शिव्या पडतायत. अरबाज, अरबाज चर्चा होतेय. भले निगेटिव्ह चर्चा होते. पण माझी चर्चा काहीच होत नाही. त्यात अरबाजची कॉपी असल्याचा टॅग हटत नाहीये. त्यामुळे तो सध्या इनसिक्योर आहे. तो जळतोय.”

हेही वाचा – ‘झिम्मा २’नंतर हेमंत ढोमेचा लवकरच येणार नवा चित्रपट, अभिनेत्याने स्वतःच्या गावात अन् शेतात केलंय चित्रीकरण

या आठवड्यात आतापर्यंत काय-काय झालं?

दरम्यान, या आठवड्याच्या पहिल्या दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडला. या नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत या सात सदस्यांना घरातल्या इतर सदस्यांनी नॉमिनेट केलं. काल दुसऱ्या दिवशी घरात बीबी करन्सीसाठी ‘BB फार्म’ टास्क देण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही टीमला नळातून येणारं दूध जमा करायचं आहे. यात दोन टीम आहेत.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस’ने निक्कीसाठी चहा बनवण्याचे आदेश देताच जान्हवी म्हणाली, “थोडी अक्कल किसून….”, नेमकं काय घडलं?

एका टीममध्ये निक्की, धनंजय, अरबाज, पॅडी, घन:श्याम हे सदस्य आहेत यांचा संचालक अभिजीत आहे. तर, वर्षा संचालक असलेल्या दुसऱ्या टीममध्ये आर्या, अंकिता, सूरज, जान्हवी आणि वैभव हे सदस्य आहेत. या टास्कच्या सुरुवातीलाच शक्तीचं प्रदर्शन झाल्यामुळे पहिली फेरी रद्द करण्यात आली. तसंच ‘बिग बॉस’कडून एक शिक्षा देखील देण्यात आली. दोन्ही टीममधील सदस्यांना विरोधी टीममधील एका सदस्याला बाद करायचं आहे. त्यामुळे आता दोन्ही टीममधील कोणता सदस्य बाद होतोय आणि कोण ‘बीबी टास्क’ जिंकतंय? हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 nikki tamboli and arbaaz patel talk about vishal pps