Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’मध्ये शनिवारी ‘भाऊच्या धक्क्या’वर ‘महाराष्ट्राचा धक्का’ पाहायला मिळाला. कामानिमित्ताने रितेश देशमुख परदेशात असल्यामुळे डॉ. निलेश साबळेची एन्ट्री झाली. त्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पत्रकारांच्या सणसणीत प्रश्नांची उत्तर सर्व सदस्य देताना पाहायला मिळाले. यादरम्यान अनेक खुलासे देखील झाले. त्यानंतर संग्राम चौगुलेची वैद्यकीय कारणास्तव घरातून एक्झिट झाली. तरीही देखील आज एलिमिनेश पार पडणार आहे. त्यामुळे आजचा ‘भाऊचा धक्का’ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. पाच स्ट्राँग सदस्यांमधून एकजण घराबाहेर होणार आहे. अशातच सेफ झालेले सदस्य आणि डेंजर झोनमध्ये असलेल्या सदस्यांचा खुलासा झाला आहे. नुकताच ‘भाऊच्या धक्क्या’च्या नवा प्रोमो समोर आला आहे.

सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा आठवा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर हे पाच सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या पाच सदस्यांपैकी कोण या आठवड्यात एलिमिनेट होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. ‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडियावर नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सेफ झालेले सदस्य आणि डेंजर झोनमध्ये असलेल्या सदस्यांचा खुलासा झाला आहे.

Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
Video of couple kissing metro station platform
मेट्रो स्टेशनवर ‘किस’ करणाऱ्या जोडप्याचा ‘तो’ Video Viral; नेटकरी म्हणे, “यात गैर काय”
appear in Celebrity MasterChef show coming soon
‘बिग बॉस मराठी ५’ फेम निक्की तांबोळी ‘या’ लोकप्रिय कार्यक्रमात झळकणार, सोबतीला असणार उषा नाडकर्णींसह प्रसिद्ध कलाकार
Bigg Boss Marathi Season 5 Fame Yogita Chavan Dance video viral
Video: “बाई हा काय प्रकार”, ‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
Paaru
Video: “मी परत आलो तर ती…”, जंगलात हरवलेली पारू आदित्यला ‘धनी’ म्हणत लाजणार; पाहा ‘पारू’ मालिकेचा प्रोमो
Bigg Boss marathi season 5 fame Jahnavi Killekar and Ghanshyam Darwade funny reel video on angaaron song from pushpa 2 movie
Video: जान्हवी किल्लेकर, घन:श्याम दरवडेचा ‘पुष्पा २’मधील ‘अंगारों’ गाण्यावरील मजेशीर रील पाहिलंत का? नेटकरी म्हणाले…
Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

हेही वाचा – किरण मानेंनी सोडली ‘तिकळी’ मालिका, आता झळकणार ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर; पोस्ट करत म्हणाले, “‘बिग बॉस’पासून…”

नव्या प्रोमोमध्ये एलिमिनेशन प्रक्रिया पाहायला मिळत आहे. अरबाज, निक्की, जान्हवी, सूरज आणि वर्षा यांच्या समोर एक बॅग आहे. या बॅगमध्ये कोण घराबाहेर जाण्यापासून वाचणार आणि कोण डेंजर झोनमध्ये असणार याची पाटी ठेवण्यात आली आहे. जान्हवी, सूरज आणि वर्षा उसगांवकर सेफ झाल्याचं पाहायला मिळत असून अरबाज आणि निक्की डेंजर झोनमध्ये आहेत. यावेळी घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव घोषित करताच निक्की अरबाजला मिठ्ठी मारून जोरात रडताना दिसत आहे. पण दोघांपैकी कोण एलिमिनेट झालंय हे प्रोमोमधून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे आता अरबाज आणि निक्कीपैकी कोण घराबाहेर होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा – Video: ७० दिवसांतच ‘बिग बॉस मराठी’ बंद होणार असल्याच्या चर्चेवर सोनाली पाटीलने व्यक्त केली नाराजी, म्हणाली, “चांगला टीआरपी असताना…”

दरम्यान, निक्की तांबोळी ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर होणार असल्याचं अनेक जण म्हणत आहेत. कारण या आठवड्यात अरबाज कॅप्टन झाला आहे. त्यामुळे तो एलिमिनेट होणार नसल्याची चर्चा सुरू आहे. तसंच दुसऱ्या बाजूला आज एलिमिनेशन होणार नसल्याचं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे आता नेमकं काय घडणार? अरबाज आणि निक्कीपैकी कोण एलिमिनेट होणार की नाही? हे आजच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर स्पष्ट होईल.

Story img Loader