Bigg Boss Marathi Season 5 : आज ‘भाऊच्या धक्क्या’वर सर्व सदस्यांना मोठे धक्के बसणार आहेत. रितेश देशमुखकडून नाही तर पत्रकारांच्या प्रश्नातून धक्के बसणार आहेत. पत्रकारांच्या या ‘महाराष्ट्राच्या धक्क्या’वर बेधडक प्रश्नांमुळे अनेक खुलासे देखील होणार आहेत. या ‘महाराष्ट्राच्या धक्क्या’वरील एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये एका प्रश्नावरून पत्रकारांसमोर निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकरमध्ये भांडताना दिसत आहेत.
‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडियावर नुकताच हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये निक्की आणि जान्हवीच्या नात्यावर एका पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर दोघींमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. नेमकं काय घडलं आहे? जाणून घ्या…
या प्रोमोमध्ये एक पत्रकार निक्कीला प्रश्न विचारते की, जान्हवीला अजून तू तितकं सडेतोड उत्तर देत नाहीस, तर तू तिला घाबरतेस? यावर जान्हवी म्हणाली, “ती मला घाबरते.” मग निक्की म्हणाली, “ती जे पण घरात करते ते फुटेजसाठी करते.” त्यानंतर जान्हवी म्हणतेय, “सगळ्यात पहिली चूक म्हणजे घरात आल्या आल्या चुकीच मैत्री.” तसंच निक्की म्हणतेय की, मी हिच्याशी संवाद केला तर ती दिसेल त्यामुळे मला ते मंजूर नाहीये. त्यावर जान्हवी ओरडून म्हणते, “तुझ्याबरोबर दिसण्यापेक्षा मी बाहेर जाईन.” अशा प्रकारे दोघी पत्रकारांसमोरच भांडताना दिसत आहेत.
हेही वाचा – Video: धनंजय पोवारची ‘ती’ कृती पाहून भारावल्या आई आणि पत्नी, ‘बिग बॉस’ना सुचवला एक नवा टास्क
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या या प्रोमोवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. निक्कीच्या समर्थनार्थ अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. “निक्की बिनधास्त मुलगी आहे…निक्की जिंकणार”, “टीआरपी क्वीन निक्की”, “सगळ्यांचा गेम निक्की भोवतीच फिरत आहे”, “एक नारी सब पे भारी…निक्की”, “निक्की मास्टरमाइंट”, “निक्की बरोबर बोलली”, “जान्हवीचा गेम प्लॅन हा निक्कीवर अवलंबून असतो”, अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd